Marathi News> मनोरंजन
Advertisement

Siddhant Chaturvedi करतोय बिग बींच्या नातीला डेट, कॅमेरा पाहाताचं नव्याने का लपवला चेहरा!

नव्या 'गली बॉय' फेम एमसी शेर म्हणजेचं सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं कळत आहे.   

Siddhant Chaturvedi करतोय बिग बींच्या नातीला डेट, कॅमेरा पाहाताचं नव्याने का लपवला चेहरा!

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर्स. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याची असते. आता देखील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटी स्वतःचं तोंड लपवताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून महानायक अमिताभ बच्चन यांची नात आहे. बिग बींची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत असल्याच्या रंगत आहेत.

दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. आता देखील नव्याला सिंद्धांर्थच्या कारमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली मुंबईत एकत्र दिसले होते. नव्याला त्यांचं नातं उघड व्हावं वाटत नसल्यामुळे तिने स्वतःचा चेहरा गुलाबी स्कार्फने लपवला

fallbacks

सध्या दोघांचा फोटो देखील सोशल माडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.   सिद्धांत  एका निर्मात्याला भेटण्यासाठीआला होता. अभिनेत्याची कार पाहताचं पापाराझी सिद्धांतला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमा झाले. पापाराझींना पाहिल्यानंतर मागे बसलेल्या व्यक्तीने मात्र स्वतःचा चेहरा लपवला. 

पापाराझीने तिचा फोटो क्लिक करण्यापूर्वीच तिने स्वतःचा चेहरा लपवला. यानंतर सिद्धांत पटकन गाडीत बसला आणि तेथून निघून गेला. या घटनेनंतर नव्या आणि सिद्धांतच्या अफेअरच्या चर्चेंना अधिकच उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या 'गली बॉय' फेम एमसी शेर म्हणजेचं सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं कळत आहे. एवढंच नाही तर त्यांचं नातं फार घट्ट असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण नव्या आणि सिद्धांतने त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, एका मुलाखतीत सिद्धांत म्हणाला की, 'मी सिंगल नाही. ती माझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे. ती मुलगी बॉलिवूडमधील आहे, पण ती अभिनेत्री नाही...' त्यामुळे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की  सिद्धांत आणि नव्या एकमेकांना डेट करत आहेत. 

 

 

 

Read More