Marathi News> मनोरंजन
Advertisement

काही तरी लाज बाळगा.... मालदीवला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन

संपूर्ण देश संकटात असताना कलाकार मात्र आपल्याच आनंदात 

काही तरी लाज बाळगा.... मालदीवला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन

मुंबई : संपूर्ण देश यावेळी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी झटत आहे. असं असताना सिने कलाकार आपल्या सुट्या घालवण्याकरता मालदीवला रवाना होत आहे. देश संकटात असताना आपली मौज बघणाऱ्या कलाकारांवर अभिनेता नवाजुद्दी सिद्दिकी भडकला आहे. यावेळी नवाजुद्दीनने या कलाकारांना चांगलेच सुनावले आहे. 

काही तरी लाज बाळगा

एका मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलंय की,'हे कलाकार अशावेळी सुट्यांवर जात आहेत. फोटो पोस्ट करत आहेत. जेव्हा संपूर्ण देश संकटात आहे. लोकांकडे जेवण नाही आणि तुम्ही एवढा खर्च करत आहात. काही तरी लाज बाळगा.'

पुढे नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, या कलाकारांकडे बोलण्यासारखं आणि वागण्यासारखं असं काहीच नाही. त्यामुळे हे लोकं देश संकटात असताना मालदीवमध्ये मजा करत आहेत. 

माझं गावचं माझं मालदीव 

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, 'या लोकांनी मालदीवला तमाशा लावला आहे. मला माहित नाही त्यांच ट्युरिझम इंडस्ट्रीसोबत असं काय नातं आहे? मात्र माणुसकीच्या नात्यातून तरी आपल्या सुट्या आणि त्यांचे फोटो स्वतःजवळच ठेवा ना. इथे प्रत्येकजण संकटात आहे.'

हे कलाकार आहेत मालदीवला 

बॉलिवूडमधील हे कलाकार आपल्या सुट्ट्या मालदीवला घालवत आहेत. रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, आलिया भट्ट, सारा अली खान या अगोदर दीया मिर्झा देखील मालदीवला जाऊन आली आहे. 

कलाकारांची मालदीवला जाण्याची रेलचेल. अनेक कलाकारांनी कोरोना काळात मालदीवमध्ये आपला वेळ घालवत आहे.

Read More