Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बजरंगी भाईजान' च्या सीक्वलमध्ये दिसणार पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाब? नवाजुद्दीन सिद्दीकचा खुलासा

Nawazuddin Siddiqui on Bajrangi Bhaijaan Sequel : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'बजरंगी भाईजान 2' मध्ये तो दिसणार की नाही याविषयी वक्तव्य केलं आहे. 

'बजरंगी भाईजान' च्या सीक्वलमध्ये दिसणार पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाब? नवाजुद्दीन सिद्दीकचा खुलासा

Nawazuddin Siddiqui on Bajrangi Bhaijaan Sequel : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 2016 मध्ये ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीनं पाकिस्तानी रिपोर्टर चांग नवाबची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या सीक्वलची माहिती समोर आली आहे. पण नवाजुद्दीन सिद्दीकीला याविषयी काही माहिती नाही की त्याला या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कास्ट करण्यात येणार आहे की नाही. याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'ला नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत नवाजुद्दीकी म्हणाला, 'सीक्वल बनवणार असल्याविषयी आम्हाला कोणतीही माहिती नाही. हे त्या चित्रपटाच्या निर्मात्यांवर आधारीत आहे. मी हे सांगू शकत नाही की आधी मी होतो तर आता देखील मला घ्या, कारण असं होतं नाही. जर त्यांना गरज असेल तर मी तयारच आहे.' नवाजुद्दीन सिद्दीकीचं हे वक्तव्य तेव्हा समोर आलं आहे जेव्हा ‘बजरंगी भाईजान’ चे लेखक वी. विजयेंद्र प्रसाद यांनी म्हटलं की ते सलमानला भेटले आणि दोघं सीक्वलवर चर्चा करत आहेत. 

गॅंग्स ऑफ वासेपुर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार की नाही?

यानंतर नवाजुद्दीनला पुढे विचारण्यात आलं की " 'गॅंग्स ऑफ वासेपुर 3' च्या फ्रेंचायझीचा तिसऱ्या भागात दिसणार आहे का? तर नवाजुद्दीननं म्हटलं की चित्रपट येणारच नाही. दिग्दर्शक अनुराग कश्यपलाच बनवायचा नाहीये. अनुरागची एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे तो जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. तो अशा लोकांपैकी एक आहे की ज्याचं एकदा काम झालं तर झालं. पुढे जायचं." 

हेही वाचा : एक नोटिस येताच लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी घरातून बेदखल; अनेक धक्कादायक खुलासे, कोण आहे हा सेलिब्रिटी?

नवाजुद्दीन सिद्दीकीला पुढे विचारण्यात आलं की "जेव्हा बडे कलाकार हे बॉक्स ऑफिस नंबर्सची गॅरेन्टी देऊ शकत नाही तर मग त्यांच्यासोबत 100 कोटींचा चित्रपट का बनवत आहेत? गॅरेन्टी तर कलाकारांची देखील नाही. ज्यांना खरंच अभिनय येतो, तर त्यांच्यासोबतच चित्रपट बनवा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं यश यातच आहे की जे 500 कोटीचा चित्रपट बनवत आहेत ते अभिनेते देखील आहेत." 

Read More