Nayanthara-Dhanush Spotted Together in Function : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता धनुष यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या सुरु झालेल्या वादामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांमध्ये चांगलाच वाद सुरु असताना ते दोघं एकाच कार्यक्रमात स्पॉट झाले आहेत. अशा परिस्थितीत ते एकमेकांशी बोलले नाही किंवा त्यांची एकमेकांना अॅटिट्यूड दाखवला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नुकतंच चित्रपट निर्माता आकाश भास्करनचं लग्न झालं. त्याच्या लग्नात अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नासाठी धनुष आणि नयनतारा या दोघांना आमंत्रण मिळाल्यानं त्या दोघांनी हजेरी लावली. नयनताराच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या डॉक्युमेंट्रीनंतर पहिल्यांदाच ते दोघं कोणत्या कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओवरून त्या दोघांमध्ये असलेला तणाव दिसून आला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही. नयनतारानं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर धनुषनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी नेसली आहे. ते दोघं वेग-वेगळ्य बाजुच्या सोफ्यावर बसले आहेत. त्या दोघांनी एकमेकांना दुर्लक्ष केलं आहे.
Nayanthara, Sivakarthikeyan, Aarthi SK and Anirudh spotted together in a recent function
— Visvesh (@PawPawVee) November 21, 2024
For more content, video va parunga #Nayanthara @Siva_Kartikeyan pic.twitter.com/aIOrNV5V5t
नयनतारा आणि धनुष यांच्यातील वादाविषयी बोलायचं झालं तर हा त्या दिवशी सुरु झाला जेव्हा तिच्या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये 3 सेकंदाचा एक व्हिडीओ होता, ज्या चित्रपटाची निर्मिती ही धनुषनं केली होती. या चित्रपटाचं नाव 'नानुम राउडी धान' आहे. या व्हिडीओला ट्रेलरमध्ये पाहून धनुषनं नयनताराच्या नावाची एक नोटीस बजावली आहे. या व्हिडीओला परवानगीशिवाय वापरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण नयनतारानं धनुषच्या नावाचं एक ओपन लेटर लिहून तिची प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात नयनतारानं धनुषवर 3 सेकंदाच्या या व्हिडीओसाठी 10 कोटींची भरपाई मागितल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा : देखण्या अभिनेत्रीचं विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिप... 'बाहरवाली' म्हणून हिणावताच म्हणाली, 'मला पश्चाताप...'
दरम्यान, 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' ही सीरिज 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. तिची ही डॉक्युमेंट्री नंबर 1 ला ट्रेंड करते. या डॉक्युमेंट्रीमधून नयनताराचं आयुष्य सगळ्यांना पाहायला मिळत आहे.