Neena Gupta on Love : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. आता नीना गुप्ता यांनी नाती आणि प्रेम या सगळ्यावर वक्तव्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की प्रेमापेक्षा त्यांना गिफ्ट्स आवडतात. आणखी नीना गुप्ता काय म्हणाल्या याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नीना गुप्ता यांनी झूमला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत नीना गुप्ताला विचारण्यात आलं की तिला एक असा पार्टनर आवडेल का जो सरप्राइज प्लॅन करणार नाही किंवा गिफ्ट्स देणार नाही. पण जो कधी कधी प्रेम नक्कीच व्यक्त करतो. त्यावर नीना गुप्ता या त्यांचं मत काय आहे ते सांगत म्हणाल्या, 'मला प्रेमा पेक्षा जास्त गिफ्ट आवडतात. प्रेमाचा अर्थ काय? मुर्खपणा. मी खूप जास्त मटेरिअलिस्टिक आहे.'
त्यानंतर नीना गुप्ता यांनी त्यांच्या एका मैत्रिणीसोबत झालेल्या चर्चे विषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, एकदा त्या त्यांच्या मैत्रिणीला सांगत होत्या की त्यांचा नवरा काही खास काम करत नाही आणि कशा प्रकारे त्यांची दुसऱ्यांशी तुलना होऊ लागली आहे. तेव्हा त्यांच्या मैत्रिणीनं तिला एक सल्ला दिला.
नीना यांनी म्हटलं की 'एकदा माझ्या मैत्रिणीनं मला खूप चांगली गोष्ट सांगितली. मी तक्रार करत होते ती माझा नवरा असं करत नाही किंवा तिचा नवरा असं करत नाही. तर तिनं मला समजावलं की तू तुझ्या नवऱ्याला सांगायला गवं की प्रेमात प्रॉपर्टी, दागिणे, कपडे या सगळ्या गोष्टी देखील असतात. जर मी फक्त इतकं सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी खूप प्रेम करते आणि फक्त इतकंच... पण हे सगळं काही नाही. तुला देखील काही करावं लागेल. काही द्यावं लागेल. कमीत कमी माझ्या वाढदिवसाला एक साडी तर द्यायला हवी.'
नीना गुप्ता लवकरच 'मेट्रो इन दिनों' मध्ये दिसणार आहेत. सध्या त्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू आणि तानी बासून यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूनं केलं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अली फजल, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीना या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात चार लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट आज 4 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर नीना यांच्या 'पंचायत' चा चौथा सीजन नुकताच प्रदर्शित झाला आहे.