Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' सेलिब्रिटी कपलकडे Good News

कलाकारांनी खास दिवशी शेअर केली गोड बातमी 

'या' सेलिब्रिटी कपलकडे Good News

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या एकीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे अनेक कलाकारांनी गोड बातमी दिली आहे. अनुष्काने काही दिवसांपूर्वी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. तर करीनाचे प्रसूती लवकरच होणार आहे. असं असताना आता आणखी एका सेलिब्रिटी कपलच्या घरी Good News आहे. 

गायिका नीति मोहन (Neeti Mohan) आणि अभिनेता निहार पांड्या (Nihar Pandya)  या सेलिब्रिटी कपलने नुकतीच गोड बातमी शेअर केली आहे. आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसादिवसी नीतिने ही बातमी शेअर केली आहे. नीति मोहनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

नीति मोहनने इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. नीति मोहन म्हणते की,'1+1=3 मॉमी टू बी आणि डॅडी टू बी.... लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी हा आनंद शेअर करण्याची संधी मिळाली. यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो?'  नीतिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

सफेद आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बीनेशनमध्ये नीतिने ड्रेस घातला आहे. निहारने नीतिच्या बेबी बंपला किस करत फोटो शेअर केला आहे. या फोटोवर मुक्ती मोहनने देखील कमेंट केली आहे. यामध्ये तिने मावशी होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. नीति मोहनचं फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्न झालं. नीति बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे तर निहार अभिनेता आहे. नीतिने 'स्टूडंट ऑफ द ईअर' या सिनेमातील 'इश्क वाला लव' या गाण्यातून गायिका म्हणून पदार्पण केलंय. तर निहारने सलमान खानच्या 'मेरीगोल्ड' सिनेमात दिसला होता 

Read More