Marathi News> मनोरंजन
Advertisement

Good News! नीति मोहनने बाळाला दिला जन्म, निहार पांड्याची खास पोस्ट

निहार आणि नीतिच्या बहिणींनी व्यक्त केला आनंद 

Good News! नीति मोहनने बाळाला दिला जन्म, निहार पांड्याची खास पोस्ट

मुंबई : गायिका नीति मोहनने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता निहार पांड्याने सुंदर पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. नीतिसोबत निहारने एक सुंदर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टवर सेलेब्स कमेंट करत असून या दोघांना पालक होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

निहार पांड्याने लिहिलं आहे की,'माझी सुंदर पत्नी मला आमच्या बाळासाठी ते सगळं काही करण्याची संधी देतेय जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे. ती प्रत्येक दिवशी माझ्या आयुष्यात प्रेम व्यक्त करत आहे. नीति आणि बाळं दोघंही ठिक आहेत. आज मुंबईच्या या सुंदर पावसाच्या वातावरणात आमच्या मुलाचा जन्म झाला. आम्ही मनापासून मोहन आणि पांड्या कुटुंबीय डॉक्टर, मित्र परिवार आणि शुभचिंतकांचे आभार मानतो. '

तसेच नीति मोहनची बहिण शक्ती मोहनने देखील इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केलाय. नीति आणि निहारचा फोटो शेअर करता 'मुलगा झाला' अशी माहिती दिली. या फोटोत निहार नीतिच्या कपाळाला किस करत आहे. नीतिच्या दुसऱ्या बहिणी मुक्तीने देखील आनंद व्यक्त केलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukti Mohan (@muktimohan)

नीति गरोदर राहिल्यानंतर तिचे डोहाळं जेवण आणि फोटोशूट प्रचंड चर्चेत होते. त्यानंतर आज ही बातमी देऊन त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. निहारने आई आणि बाळ दोघेही ठिक असल्याचे पोस्टद्वारे सांगितले आहे.

गायिका नीतिने फेब्रुवारी महिन्यात आपण आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. नीतिने सोशल मिडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. या फोटोमध्ये निहार नीतिच्या बेबी बंपला किस करुन आम्ही लवकरच दोनाचे तीन होणार आहोत असे सांगितले होते.

Read More