Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्य-नेहा कक्कड १४ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार?

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा

आदित्य-नेहा कक्कड १४ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार?

मुंबई : टेलिव्हिजन शो 'इंडियन आयडॉल ११'मध्ये गायिका नेहा कक्कड  (Neha Kakkar) जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर याच 'इंडियन आयडॉल ११' शोमध्ये सिंगर आदित्य नारायण होस्टिंग करतो. पण सध्या या शोमध्ये एक वेगळीच चर्चा होताना दिसतेय. 

शोमध्ये नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आता नेहा आणि आदित्यच्या लग्नाची तारीखही समोर आल्याचं बोललं जातंय. येत्या १४ फेब्रुवारी रोजी ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 

'इंडियन आयडॉल ११' कार्यक्रमात नेहा कक्कड आणि आदित्य नारायण या दोघांचे आई-वडील पोहचले होते. कार्यक्रमादरम्यान आदित्यने, नेहाची त्याच्या आई-वडिलांशी भेटही घडवून आणली. गायक उदित नारायण यांनी शोमध्ये एन्ट्री करताच ते आदित्य आणि नेहाचं लग्न ठरवण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.

fallbacks

त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.

  

Read More