Marathi News> मनोरंजन
Advertisement

उशिरा आल्याबद्दल प्रेक्षकांनी जाब विचारला, नेहा कक्कर भर मंचावर रडली; आता म्हणते 'मला दोषी ठरवल्याचा...'

बॉलिवूड गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) मेलबर्नमधील कॉन्सर्टमध्ये उशिरा आली असता प्रेक्षकांनी तिला जाब विचारला होता. यानंतर नेहा कक्कर भर मंचावर रडली होती.   

उशिरा आल्याबद्दल प्रेक्षकांनी जाब विचारला, नेहा कक्कर भर मंचावर रडली; आता म्हणते 'मला दोषी ठरवल्याचा...'

बॉलिवूड गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) मेलबर्नमधील कॉन्सर्टमध्ये उशिरा आली असता प्रेक्षकांनी तिला जाब विचारला होता. नेहा कक्करने दोन ते तीन तास वाट पाहायला लावल्याने प्रेक्षक प्रचंड संतापले होते. नेहा कक्कर मंचावर आल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्यासमोर आपली नाराजी जाहीर केली. त्यानंतर नेहा कक्करला मंचावरच अश्रू अनावर झाले होते. तिचे रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता नेहा कक्कर पहिल्यांदाच यावर व्यक्त झाली आहे. 

मेलबर्न कॉन्सर्टमधील वादावर नेहा कक्करने पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "सत्य समोर येण्याची वाट पाहा". थोडक्यात नेहा कक्करला आपल्याला झालेला उशीर यासाठी इतर कोणी कारणीभूत असल्याचं सांगायचं आहे. 

सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर तिच्या बचावासाठी पुढे आला होता. तिच्या अश्रूंना 'खोटे' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना त्याने उत्तर दिलं होतं. यानंतर आता नेहाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "लोकांनी तिच्याबद्दल थेट मत तयार करण्याऐवजी सत्य समोर येण्याची वाट पहावी".

fallbacks

"सत्याची वाट पहा, मला इतक्या लवकर दोषी ठरवल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल," असं नेहाने पोस्टमध्ये लिहिलं आहे, तसंच दुःख दर्शविणारा इमोजीही जोडला आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला, नेहा कक्कर मेलबर्नमध्ये परफॉर्म करणार होती. परंतु प्रेक्षकांनी नेहा तीन तास उशिरा आल्याचा दावा केला होता. संतप्त गर्दीने निघून जाण्यास सांगितलं असता नेहा स्टेजवरच रडू लागली. कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याबद्दल माफी मागितल्यानंतर तिने तुमचं मन तृप्त करणारा परफॉर्मन्स देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

काही उपस्थितांनी कक्करबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी निराशा व्यक्त केली. सुरुवातीच्या प्रतिक्रियेनंतरही, गायिकेने प्रेक्षकांना आश्वासन दिले की ती एक मनोरंजक सादरीकरण करेल. ट्रोलिंगनंतर, टोनीने परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.  ज्यामध्ये आयोजकांच्या गैरव्यवस्थापनामुळे उशीर झाला असा त्याचा दावा होता. 

Read More