Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्यानं शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं अन्...'; नेहा पेंडसेला कामाच्या नावाखाली दिली घाणेरडी ऑफर

Neha Pendse : नेहा पेंडसेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'त्यानं शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं अन्...'; नेहा पेंडसेला कामाच्या नावाखाली दिली घाणेरडी ऑफर

Neha Pendse : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिच्या करिअरची सुरुवात खूप कमी वयात केली होती. तिनं सांगितलं की तिची पहिली कमाई ही फक्त 500 रुपये होती. पण आज ती छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावर देखील तिच्या उत्तम कामासाठी ओळखली जाते. नेहाविषयी बोलायचं झालं तर तिनं सगळ्यात आधी छोट्या पडद्यावरील एक मालिका 'कॅप्टन हाउस' मध्ये काम केलं. त्यानंतर ती 'पडोसन' आणि 'हसरते' या मालिकांमध्ये दिसले. तर ती सगळ्यातआधी 'दाग: द फायर' या चित्रपटात दिसली होती. तिनं यात सनी देओलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 

इतकंच नाही तर नेहा पेंडसेनं तेलगू, तमिळ आणि मराठी भाषांमध्ये देखील काम केलं आहे. प्रत्येक भाषेत तिला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं आहे. नेहानं तिच्या मुलाखतीत सांगितलं की एकदा कोणीतरी तिला चुकीच्या हेतूनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. तिनं त्याला स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली की 'अशा गोष्टी ऐकून खूप वाईट वाटतं, पण तिनं कधीही हार मानली नाही. जेव्हा काम मिळत नव्हतं तेव्हा तिनं हार मानली नाही.' तिचं म्हणणं आहे की 'जर कोणतीही व्यक्ती ही मेहनत करत असेल तर एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होते.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

नेहा नुकतीच मराठी चित्रपट 'जून' मध्ये दिसली. या चित्रपटाची सगळीकडे चर्चा झाली. त्याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिका 'भाभीजी घर पर हैं' आणि 'May I Come In Madam?' सारख्या मालिकांमध्ये ती दिसली. तिचं म्हणणं होतं की तिनं जे काही केलं ते तिच्या मेहनतीनं केलं आहे. त्यावर तिला गर्व आहे. ती आजही वेगवेगळ्या भूमिका साकारत लोकांचं मनोरंजन करताना दिसते. 

यावेळी नेहानं सांगितलं की 'तिनं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बालपणीचं तिनं पैसे कमावणं सुरु केलं होतं. 10 वर्षांची असताना तिनं 500 रुपये कमावले होते. ते तिनं तिच्या आई-वडिलांनी दिले.' नेहाच्या कुटुंबात कोणी देखील चित्रपटसृष्टीतून नाही. त्याचं कारणामुळे तिला खूप काही सहन करावं लागलं असं तिचं म्हणणं आहे. नातेवाईकांनी अनेक गोष्टी सुनावल्या कारण 20 वर्षांआधी मुलींनी चित्रपटसृष्टीत येनं आणि काम करणं हे योग्य समजलं जातं नव्हतं. त्याविषयी नेहानं पुढे म्हटलं की 'मला खूप टोमणे मारले जायचे आणि आज जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा तेच नातेवाई म्हणू लागले की अरे नेहा तर माझी चुलत बहीण आहे, नेहा माझी बहीण आहे.' 

Read More