Marathi News> मनोरंजन
Advertisement

पोलडान्समुळे चर्चेत आलेली 'ही' मराठी अभिनेत्री कपिल शर्माच्या शोची होस्ट होणार ?

सहकलाकारासोबत नशेत केलेले भांडण आणि त्यानंतर आजारपणामुळे अभिनेता कपिल शर्मा  टेलिव्हिजनपासून दुरावला होता.

पोलडान्समुळे चर्चेत आलेली 'ही' मराठी अभिनेत्री कपिल शर्माच्या शोची होस्ट होणार ?

मुंबई : सहकलाकारासोबत नशेत केलेले भांडण आणि त्यानंतर आजारपणामुळे अभिनेता कपिल शर्मा  टेलिव्हिजनपासून दुरावला होता.

नैराश्यामध्ये असलेल्या कपिल शर्माने उपचारानंतर पुन्हा कॉमेडी शो मध्ये कमबॅक करण्याचे प्लॅनिंग केले आहे.  

25 मार्चपासून येणार टेलिव्हिजनवर  

फॅमिली टाईम विद कपिल शर्मा असे कपिलच्या नव्या शोचं नाव आहे. यामध्ये कुटुंबासोबत काही खेळ खेळले जाणार आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात येणार्‍या या कॉमेडी शो बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  

नेहा पेंडसे करणार सूत्रसंचालन ? 

पहिल्या प्रोमोमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदारनंतर आता अजून एका मराठी कलाकाराचे नाव कपिल शर्माच्या नव्या शोसोबत जोडले आहे. 

'मे आई कम इन मैडम?' या मालिकेतून चर्चेमध्ये आलेली नेहा पेंडसे आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी वजन जास्त असल्याने तिला काही प्रोजेक्ट्स नाकारण्यात आले होते असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. मात्र त्यानंतर वजन घटवण्यासाठी नेहाने खूपच मेहनत घेतली आहे. 

 

 

Throwback to eh well, last weekend  #takemehome #tiredpigeon

A post shared by NEIIYAA PENDSAY (@nehhapendse) on

पोलडान्समुळे चर्चेत आली होती नेहा 

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर नेहाने पोलडांस करताने व्हिडिओ शेअर केले आहेत. मराठी सिनेमा आणि मालिकांमधून नेहा यापूर्वी रसिकांच्या भेटीला आली होती. 

 

अजय देवगणसोबत रंगणार पहिला एपिसोड 

 

पहिल्याच एपिसोडमध्ये अजय देवगण दिसणार आहे. त्याचा खास प्रोमो रसिकांच्या भेटीला आला आहे. 'रेड' या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी अजय कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहे. 

Read More