Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिनेरसिकांसाठी वाईट बातमी ; Netflix वरून गायब होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, आताच पाहून घ्या...

Netflix April 2025 list: शेवटच्या तारखेच्या आत पाहून घ्या विचार करायला लावणारे, मनोरंजन करणारे आणि काय कमाल सीरिज/ चित्रपट आहे असं म्हणायला भाग पाडणाऱ्या या कलाकृती... 

सिनेरसिकांसाठी वाईट बातमी ; Netflix वरून गायब होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, आताच पाहून घ्या...

Netflix remove movies and shows: ओटीटी विश्वामध्ये फार आधीपासूनच लोकप्रिय असणारं Netflix हे अनेकांच्याच आवडीचं माध्यम. अशा या Netflix वर जगाच्या कानाकोपऱ्यातील, विविध भाषांमधील अनेक सीरिज, माहितीपट, चित्रपट, लघुपट अगदी सहजपणे आणि तेसुद्धा तुम्हाला समजू शकेल अशा भाषेत पाहता येतात. मात्र आता नेटफ्लिक्सच काही चित्रपट आणि सीरिजसह तत्सम कलाकृतींना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. 

Netflix कडून वेळोवेळी युजरची पसंती लक्षात घेत कलाकृतींची यादी अपडेट केली जाते. नव्यानं काही कलाकृती इथं जोडल्या जातात, तर काही कलाकृतींना बाहेरची वाट दाखवली जाते. प्रत्येक चित्रपट किंवा अशा कलाकृतींसोबत नेटफ्लिक्सची एक लायसन्सिंग अॅग्रीमेंट असते. हा करार संपल्यानंतर कलाकृती या प्लॅटफॉर्मवरून हटवल्या जातात. यावेळीसुद्धा येत्या एप्रिल महिन्यापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकृती इथून हटवल्या जातील. यामध्ये काही Netflix Originals चासुद्धा समावेश आहे. त्यामुळं आतापर्यंत हे चित्रपट किंवा सीरिज पाहिले नसल्यास सिनेरसिकांनी लगेचच त्या पाहणं उत्म

एप्रिल महिन्यात Netflix वरून हटवल्या जाणाऱ्या कलाकृती खालीलप्रमाणे... 

1 एप्रिल 

• IT (2017)
• Rush Hour Trilogy (1998, 2001, 2007)
• The Karate Kid Trilogy (1984, 1986, 1989)
• The Menu (2022)
• The Scorpion King (2002)
• An Affair to Remember (1957)
• Baby Driver (2017)
• Boyz n the Hood (1991)
• Bruce Almighty (2003)
• How to Train Your Dragon (2010)
• Interstellar (2014)

3 एप्रिल 

• Powerpuff Girls (Seasons 1-6)
• Surviving R. Kelly (Season 1)

5 एप्रिल 

• Coded Bias (2020)
• Fix Us (2019)

8 एप्रिल 

• Megan Leavey (2017)

10 एप्रिल

• The Act of Killing: Theatrical Cut (2012)

12 एप्रिल 

• A Quiet Place Part II (2021)
• Clifford the Big Red Dog (2021)

15 एप्रिल 

• Hereditary (2018)

26 एप्रिल 

• Knights of the Zodiac (2023)
• Yogi Berra: It Ain’t Over (2023)

तुम्हीही मिळवू शकता या चित्रपटांसंदर्भातली माहिती... 

नेटफ्लिक्सच्या होमपेज सेक्शनमध्ये Leaving Soon नावाचं एक सेक्शन असून तिथं यासंदर्भातील माहिती दिली जाते. याशिवाय अधिकृत ब्लॉग, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमातूनही नेटफ्लिक्स या कलाकृतींसंदर्भात अपडेट देत असतं. FlixPatrol, JustWatch अशा थर्ड पार्टी वेबसाईटवरही नेटफ्लिक्सवरून येत्या काळात बाहेर पडणाऱ्या या चित्रपटांसह सीरिजची यादी दिली जाते. 

Read More