Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

मुंबई : 'गंमत जंमत' या १९८७ मध्ये आलेल्या चित्रपटतील 'अश्विनी ये ना' हे गाणं चांगलंच गाजलं होतं. तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटातून एका नव्या रुपात हे गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नुकतंच 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. 'अश्विनी ये ना...' या गाण्याच्या म्युझिक लॉन्चवेळी अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर यांनीही हजेरी लावली होती.

गायक अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी 'अश्विनी ये ना...' हे गाणं गायलं आहे. चित्रपटातात या गाण्याशिवाय आणखी दोन गाणी असून शाल्मली खोलगडे, मिक्का सिंग यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा २', अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओने चित्रपटाची  निर्मिती केली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांनी केलं आहे.

'ये रे ये रे पैसा २'मधून अनिकेत विश्वासराव, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी तगडी स्टारकास्ट भूमिका साकारणार आहे. येत्या ९ ऑगस्टला 'ये रे ये रे पैसा २' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read More