Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकी- कतरिनाला सहन होईना दुरावा; आठवणीनं व्याकुळ होत दोघांचाही मोठा निर्णय

दुरावाही त्यांना सहन झाला नाही. 

विकी- कतरिनाला सहन होईना दुरावा; आठवणीनं व्याकुळ होत दोघांचाही मोठा निर्णय

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी काही दिवसांपूर्वीच जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. प्रेम आणि विश्वासाच्या बळावर विकीनं कतरिनाचं मन जिंकत तिला आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलं. 

एकमेकांच्या स्वाधीन आयुष्याची उर्वरित वर्ष सोपवत या दोघांनीही एक नवा अध्यायच लिहिला. (Katrina kaif Vicky kaushal)

सर्वत्रच या लग्नाची चर्चा झाली. ज्यानंतर आता लग्नानंतरही ही जोडी सर्वांच्याच नजरा वळवत आहे. 

रसोईच्या परंपरेनंतर कतरिना कौशल कुटुंबाची सून म्हणून तिची ही जबाबदारी पार पाडत असतानाच आता म्हणे विकी तिला एकटीला सोडून काहीसा दूर गेला आहे. 

कतरिनासोबत काही खास क्षण व्यतीत केल्यानंतर विकी पुन्हा एकदा चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी रुजू झाला आहे. सध्या त्यानं इंदौरची वाट धरली आहे.

एकमेकांपासून दुरावल्यानंतर काही क्षणांनीच त्यांच्यामध्ये दुरावा आला आणि हा दुरावाही त्यांना सहन झाला नाही. 

विकी आणि कतरिनाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून हेच लक्षात येत आहे. जिथं त्यांनी एकमेकांचे हात पडकलेला एक फोटो शेअर केला आहे. 

एकिकडे कतरिना या फोटोला होम, असं म्हणतेय तर विकीनं या फोटोवर एक हार्ट रेखाटला आहे. 

नव्या नवरीची नवलाई कतरिनाच्या हाती दिसत आहे. अर्थात तिच्या हाती असणारा लाल रंगाचा चुडा खुप काही सांगून जात आहे. 

fallbacks

एकमेकांपासूनचा दुरावा सहन होत नाही, म्हणून फोटोंच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत आपण एकमेकांसोबतच आहोत हे दाखवणारा विकी आणि कतरिनाचा हा फोटो म्हणजे, 'क्या बात...' नाही का? 

Read More