Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nikki Tamboliच्या भावाचं कोरोनामुळे निधन

कोरोना व्हायरस मुळे अनेकांनी आपल्या जवळच्या आणि खास लोकांना गमावलं आहे. 

Nikki Tamboliच्या भावाचं कोरोनामुळे निधन

मुंबई : कोरोना या एका अदृश्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची संख्या तर वाढतचं आहे. पण दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढत आहे. या व्हायरस मुळे अनेकांनी आपल्या जवळच्या आणि खास लोकांना गमावलं आहे. अशात अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळीच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे.  निक्की तांबोळीचा भाऊ जतिन (Jatin Tamboli)चं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना संक्रमित असल्यामुळे त्याच्यावर उरपचार सुरू होते. 

पण मंगळवारी त्यानं अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला.  काही दिवसांपूर्वी जतिनला कोरोनाची लागण झाली होती. निक्की भावाच्या दिर्घायुष्यासाठी दोन दिवसांपूर्वी पूजा देखील ठेवली होती. पण निक्कीच्या भावाची प्रकृती दिवसागणिक चिंताजनक होत होती. भावाच्या मृत्यूमुळे निक्की आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

निक्कीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावाच्या निधनाची बातमी दिली. 'आम्हाला माहित नव्हतं आज सकाळी तुला देव स्वतःकडे बोलावून घेईल. जीवनात आम्ही तुला भरभरून प्रेम दिलं. तू आता आमच्यात नसला तरी आम्ही तुझ्यावर तेवढंच प्रेम करू. तू एकटा नाही गेलास तुझ्यासोबत आमचा एक भाग देखील गेला आहे.' असं म्हणतं निक्कीने स्वतःचं दुःख व्यक्त केलं. 

Read More