Nikki Tamboli Net Worth: मॉडेल, अभिनेत्री निक्की तांबोळी मराठी बिग बॉस सिझन 4 नंतर खूप चर्चेत आली. शिव ठाकरे, एमसी स्टॅण्ड यांना थेट भिडणारा तिचा स्वभाव तिच्या चाहत्यांना आवडला. या शोमध्येच अरबाज पटेल आणि निक्कीतील मैत्री साऱ्यांना पाहायला मिळाली. स्पर्धक म्हणून सहभागी झालेली निक्की त्या स्पर्धेत उपविजेती ठरली होती. दरम्यान आता तिने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्येही आपला दबदबा कायम ठेवला. दरम्यान निक्की तांबोळी किती कोटींची मालकीण आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
निक्की तांबोळीने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. हा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरव खन्नाने या हंगामाचा किताब जिंकला आहे. तर निक्की तांबोळी आणि तेजस्वी प्रकाश या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उपविजेत्या ठरल्या आहेत. संपूर्ण सीझनमध्ये निक्कीने तिच्या स्वयंपाक कौशल्याने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.
कोइमोईच्या समोर आलेल्या अहवालानुसार निक्की तांबोळीची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. निक्की बिग बॉस 5 मराठीची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती आणि ती दर आठवड्याला 3.75 लाख रुपये फी आकारत असे. आता ती सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये खूप पैसे कमवत आहे आणि आठवड्याला दीड लाख रुपये कमवते.
हिंदी अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निक्की तांबोळी यांनी बिग बॉस 14 आणि कलर्स टीव्हीवरील खतरों के खिलाडी 11 मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला. तिची आई प्रमिला बोडखे या गृहिणी आहेत आणि वडील दिगंबर तांबोळी हे एक व्यापारी आहेत. निक्कीने आपले शिक्षण औरंगाबादच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. नंतर मुंबईतील किशनचंद चेल्लाराम कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले. पुढे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने मुंबईत अभिनयाचा कोर्स केला.
रिअॅलिटी शो व्यतिरिक्त निक्कीने टी-सीरीज, सारेगामा आणि देसी म्युझिक फॅक्टरी सारख्या चॅनेलसह अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. 2022 मध्ये निक्की तांबोळीने कलर्स टीव्हीवरील भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी आयोजित केलेल्या 'द खटरा खटरा' या गेम शोमध्ये दिसली होती.