Vibhu Raghav Death: 'निशा और उसके कजिन्स' मालिकेत झळकलेला लोकप्रिय अभिनेता विभु राघव यांचे सोमवारी निधन झाले. विभु यांचे खरे नाव वैभव कुमार सिंह राघव असे होते. विभु यांना स्टेज 4 चा कोलन कॅन्सर होता. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विभु राघव टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा होते. त्यांनी निशा और उसके कजिन्स, सावधान इंडिया सारख्या शोमध्ये काम केले होते. 2022मध्ये त्यांना कोलन कॅन्सरचे निदान झाले. त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसंच, त्यांच्या फॉलोवर्सनादेखील त्यांच्या आरोग्याबाबत अपडेट देत असायचे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारादरम्यान अभिनेत्री सिंपल कौल, आदिती मलिक आणि अन्य कलाकारांनी त्यांच्या उपचारांसाठी सोशल मीडियावर मदत मागितली होती. सिंपल यांनी 27 मे रोजी एक भावूक अपीलदेखील केली होती. सर्वांना नमस्कार, आमचे मित्र विभुच्या बाबतीत एक छोटीशी अपडेट. तो आमचा मित्र आणि आमच्या रेस्तरॉंचा पार्टनर आहे. तो आमच्या कुटुंबासारखाच आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तो नानावटी रुग्णालयात कर्करोगाशी झुंजत असून त्याला स्टेज 4चा कर्करोग आहे.
सिंपल कौल यानेच विभु यांच्या निधनाची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आहे. तिने लिहलं आहे की, माझा चांगला मित्र तुझी खूप आठवण येईल. तुला खूप प्रेम आणि आनंद...., असं तिने म्हटलं आहे.
विभु यांनी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट 12 एप्रिल रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं होतं की, सगळ्यात 'एक दिवस, पुन्हा एकदा...'