Nora Fatehi Cryptic Post : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होतात. असाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तिचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसतेय. हे पाहून तिचे चाहते खूप चिंतेत आहेत. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केलेला आहे. या दरम्यान, तिचा एक चाहता तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जवळ येतो, पण नोरा फतेहीच्या बॉडीगार्डनं त्याला खांद्याला पकडून लांब केलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नोरानं देखील त्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने अरबी भाषेत लिहिलं होतं, 'इन्ना लिलाही वा इलायही राजी उन।' ज्याचा अर्थ आहे. 'आपण अल्लाहचेच आहोत आणि शेवटी त्याच्याकडेच परत जाणार आहोत.' ही ओळ सहसा कुणाच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना वापरली जाते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणखीनच चिंतेचं वातावरण निर्माण झालं. नेमकं नोरा फतेही का रडत होती, याचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
नोराचा जन्म कॅनडाच्या टोरंटो शहरात झाला आणि तिथंच तिचं बालपण गेलं. ती मूळ मोरक्कोची संबंधित आहेत. तिनं 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Roar: Tigers of the Sundarbans’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या 'दिलबर', 'साकी साकी', 'कमरिया', 'गर्मी' या गाण्यांमुळे तिला घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे तिनं बेली डान्सचं प्रशिक्षण ऑनलाइन व्हिडीओज बघून घेतलं आणि आज ती संपूर्ण देशभरात एक जबरदस्त डान्सर म्हणून ओळखली जाते.
हेही वाचा : 'करीना ताई आणि सैफ भाउजीस्नी...'; बेबोच्या 'त्या' पोस्टमुळे तिला आयुष्यभरासाठी 'पुरेपूर कोल्हापूर'मध्ये जेवण फ्री
ती 'बिग बॉस 9' आणि 'झलक दिखला जा'सारख्या रिअॅलिटी शोजमध्येही दिसली आहे. अलीकडे ती नेटफ्लिक्सच्या The Royals या वेबसीरिजमध्ये दिसली होती, जिथे ती ईशान खट्टर, भूमि पेडणेकर, साक्षी तंवर, चंकी पांडे आणि झीनत अमान यांच्यासोबत दिसली. आता तिचं हे अश्रूंमध्ये दिसणं आणि त्याआधीचं तिचं भावनिक पोस्ट, हे पाहता अनेकजण विचार करत आहेत. नोरा बरोबर नेमकं काय झालं आहे?