Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kusu Kusu Song | Nora Fatehi एवढ्या कमी कपड्यात नोरा फतेहीचा पहिल्यांदाच डान्स

कमी कपड्यात नोराचा डान्स तडका, तुम्ही म्हणाल, नोरा हे काय?  

Kusu Kusu Song | Nora Fatehi एवढ्या कमी कपड्यात नोरा फतेहीचा पहिल्यांदाच डान्स

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री नोरा फतेही बद्दल अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. 'जब तक सूरज-चांद रहेगा, जॉन की फिल्मो में नोरा का नाम रहेगा...', 'दुनिया इधर से उधर हो सकती है लेकीन जॉन की फिल्म से नोरा नही जा सकती...' असे अनेक मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  'सत्यमेव जयते 2'चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडिया युझर्स सक्रिय झाले आहेत. अनेक युजर्सनी नोराच्या उपस्थितीबद्दल प्रश्नही केला होता. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की नोरा आणि जॉनचा आयटम सॉन्ग रिलीज झाला आहे.

नोराचे आयटम सान्ग कुसू-कुसू हे गाणे बुधवारी रिलीज झाले. हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे, तर झारा खान आणि देव नेगी यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात नोरा खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. गाण्यात नोराने सोनेरी आणि पिवळ्या रंगाचा कॉम्बिनेशन ड्रेस घातला आहे. नोराच्या डान्सिंग मूव्ह आणि मोकळे केस गाण्याचं हॉटनेस वाढवत आहेत. नोराच्या हॉटनेसची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक नोराला त्याच्या चित्रपटाचा भाग्यवान चार्म मानतात. नोरासोबत त्याने सलग दोन सुपरहिट गाणी दिली आहेत. या गाण्यांच्या लोकप्रियतेचा चित्रपटाच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे. आता नोरा दिग्दर्शकासोबत तिसऱ्या गाण्यात दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार स्टारर चित्रपट 'सत्यमेव जयते 2' 26 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Read More