Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, नोरा फतेही Oops Moment ची शिकार

 एखाद्या सेलिब्रिटीला इव्हेंट किंवा अवॉर्ड फंक्शनला जायचं असेल तेव्हा प्रश्न येतो तो म्हणजे त्यांच्या ड्रेसचा.

बोल्ड ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, नोरा फतेही Oops Moment ची शिकार

मुंबई : एखाद्या सेलिब्रिटीला इव्हेंट किंवा अवॉर्ड फंक्शनला जायचं असेल तेव्हा प्रश्न येतो तो म्हणजे त्यांच्या ड्रेसचा. बॉलीवूड अभिनेत्री अशा ड्रेसची निवड करतात की अनेकवेळा प्रेक्षक या अभिनेत्रीने काय परिधान केलं आहे. असा विचार पडतो. अभिनेत्री कधी-कधी इतका बोल्ड ड्रेस परिधान करतात की, त्यांना ते ड्रेस स्वतःला सांभाळणं कठीण जातं.

असाच काहीसा प्रकार अभिनेत्री नोरा फतेहीसोबत घडला आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये नोरा एवढा बोल्ड ड्रेस घालून पोहोचली होती की, हळूहळू तिचा ड्रेस खाली सरकू लागला. यानंतर नोराने मीडियासमोर तिचा ड्रेस फिक्स करायला सुरुवात केली.

2018 च्या 'लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स' फंक्शनमध्ये नोरासोबत ही घटना घडली. या अवॉर्ड शोमध्ये नोरा नेहमीप्रमाणे बोल्ड ड्रेस परिधान करून आली होती. ऑफ शोल्डर ड्रेस घालून नोरा रेड कार्पेटवर पोहोचताच कॅमेरे तिच्याकडे वळले.

या अवॉर्ड फंक्शनमध्ये नोराने क्रीम कलरचा ऑफ शोल्डर अतिशय टाइट गाऊन परिधान केला होता.  या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस परिधान करून नोरा मीडियाशी संवाद साधण्यासाठी रेड कार्पेटवर येताच अनेकवेळा तिचा ड्रेस एडजस्ट करताना दिसली. ती वारंवार ड्रेस वर सरकतानाही दिसली. व्हिडिओमध्ये नोराला पाहून हे स्पष्ट होतं की, अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच अस्वस्थ आहे.

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, नोराला हा ड्रेस सांभाळणं किती कठीण जात आहे.  तरी देखील अभिनेत्रीने हा ड्रेस कसा तरी हाताळला आणि रेड कार्पेटवर जोरदार पोझ दिल्या. नोराच्या या व्हिडिओची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. मात्र, अशाप्रकारे तिचा ड्रेस फिक्स करताना अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नोरा अनेकदा तिच्या ड्रेसमुळेओप्स मोमेंटच्या तावडीत सापडली आहे.

Read More