Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणतायत, 'काही तर लाज वाटू दे...'

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्समुळे ओळखली जाते. तिने अनेक आयटम साँग्स केले आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणतायत, 'काही तर लाज वाटू दे...'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्समुळे ओळखली जाते. तिने अनेक आयटम साँग्स केले आहेत. नोराला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिला तिच्या डान्समुळे ओळखलं जातं. हल्ली सोशल मीडियावर तिच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नोराने तिचा व्हिडिओ तिच्या फॅनच्या पेजवर शेअर केला आहे.

नोराचा हा व्हिडिओ समोर आल्यावर अनेक लोकांनी तिला ट्रोल केलं. तिला एका यूजरने रमजानमध्ये डान्स न करण्याचा सल्ला दिला आहे. नोराने या व्हिडिओमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओवर संस्कृती रक्षकांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

एक युझर म्हणाला की, 'बाई रमजान सारखा पवित्र महिना सुरु आहे. तुला या महिन्यात असे करणं शोभा देत नाही. तुला जर संस्कृतीचे पालन करता येत नसेल तर, निदान अपमान तरी करु नकोस', या शब्दात त्याने नोरावर जोरदार टीका केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi Fan | (@norafatehi_team_) on

नोराने ‘बाहुबली’, 'स्त्री’ आणि ‘सत्यमेव जयते’ या सारख्या चित्रपटात आयटम साँग केले आहेत. कॅनडाच्या या डान्सरला बिग बॉस या रियॅलटी कार्यक्रमापासून ओळख मिळाली. नोरा नेहमी तिच्या डान्सने प्रेक्षकांवर जादू करते. 

नोराने काही गायकांबरोबर अल्बमसाठी देखील काम केलं आहे. नोरा सलमान खान–कतरिना कैफचा आगामी चित्रपट ‘भारत’, तर श्रद्धा कपूर-वरुण धवन यांच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर’या चित्रपटात दिसणार आहे.  

बिग बॉस कार्यक्रम सुरू असताना प्रिन्स नरुला आणि नोरा यांच्यात जवळीकता वाढली होती. यानंतर प्रिन्स युविका चौधरी बरोबर लग्न केलं होतं. नोराच नाव अंगद बेदी बरोबर जोडले गेले होतं.  

Read More