बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव नेहमीच वेगवेगळ्या अभिनेत्रींशी जोडण्यात आलं आहे. कार्तिक आर्यनचं त्याची लव्ह आज कलमधील सह-अभिनेत्री सारा अली खानसह बराच काळ अफेअर सुरु होतं. याव्यतिरिक्त जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांचयासोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान नुकतंच पार पडलेल्या IIFA 2025 पुरस्कार सोहळ्यात नोरा फतेहीने कार्तिक आर्यनच्या डेटिंगचा इतिहास काढत त्याला ट्रोल केलं. इंडस्ट्रीत असं कोणती अभिनेत्री आहे का जिला तू डेट केलेलं नाहीस? असा प्रश्न नोरा फतेहीने विचारताच उपस्थित सर्वजण हसू लागले.
आयफा पुरस्कार सोहळ्यात कार्तिक आर्यन करण जोहरसोबत सूत्रसंचालन करत होता. यावेळी उपस्थित अभिनेते, अभिनेत्रींशी दोघे संवाद साधत होते. यावेळी करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांनी खाली बसलेल्या नोराशी संवाद साधला. नोरा फतेही यावेळी पहिल्या रांगेत बसली होती. करणने यावेळी संवाद सुरु करत, 'तू लंडनला फर्स्ट-क्लास तिकीटाने जाशील का?' असं विचारलं. त्यावर नोराने मस्करीत विचारलं, 'मी तुझ्यासह जाणार आहे का?'. त्यावर करणने स्पष्ट केलं की, 'मी कार्तिकविषयी बोलत आहे'.
कार्तिकने यावेळी मी किंवा करण नाही तर तुला लंडनला जाण्यासाठी स्पॉन्सर्ड तिकीट आहे असं स्पष्ट केलं. करणने नंतर यावेळी नोराला ती सिंगल आहे का? अशी विचारणा केली. तसंच तू मला काल रात्री सांगितलं होतंस असंही म्हटलं. यानंतर नोरा संधी साधत कार्तिक आर्यनला त्याच्या जुन्या अफेअर्सचं सांगत छेडते. "इंडस्ट्रीत असं कोणी आहे का जिला तू डेट केलेलं नाहीस?" असं नोरा विचारतो. यानंतर उपस्थित सर्वजण खळखळून हसू लागतात. यानंतर कार्तिक म्हणतो, 'ती फक्त प्रश्न विचारत आहे.
Nora roasted Kartik about his dating history #IIFA2025 #KartikAryan pic.twitter.com/KFZNDMHbiw
— Redditbollywood (@redditbollywood) March 11, 2025
आयफा कार्यक्रमात कार्तिक आर्यनच्या आईने त्याच्या आणि अभिनेत्री श्रीलीला यांच्यातील संबंधांबद्दल गमतीशीरपणे संकेत दिले. जेव्हा होस्ट करण जोहरने विचारले की सून म्हणून अभिनेत्रीला प्राधान्य द्याल का? तेव्हा तिने उत्तर दिले की कुटुंबाची पसंती डॉक्टर आहे. महत्त्वाचं म्हणजे, श्रीलीलाकडे एमबीबीएस पदवी आहे. नुकतीच ती कार्तिकच्या कुटुंबासह एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.
#KartikAaryan's mother hinted at her son dating #Sreeleela
— (@SAMTHEBESTEST_) March 12, 2025
She said, "Ghar ki demand is a very good doctor."
Sreeleela is an MBBS graduate pic.twitter.com/Jk757muOgN
कार्तिक आर्यनला 'भूल भूलैय्या 3' साठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. दरम्यान अनुराग बासूच्या पुढील चित्रपटात तो श्रीलीलासह दिसणार आहे.