Marathi News> मनोरंजन
Advertisement

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते. 

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे लाखो चाहते आहेत. त्यातही त्याच्या चाहत्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही तरुणींची आहे. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यात अनेकदा त्याचं नाव हे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडण्यात येतं. पण सलमानला लग्नासाठी आणि त्याची बायको म्हणून कोणती अभिनेत्री वाटली होती? हे तुम्हाला माहितीये का? तर तुम्हाला वाटलं असेल की ऐश्वर्या किंवा कतरिना असून शकते. मात्र, त्याला लग्नासाठी परफेक्ट बायको म्हणून लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा ही वाटली होती. 

सलमान आणि प्रीति जिंटानं ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’, ‘दिल ने जिसे अपना कहा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडी ही मोठ्या पडद्यावर हिट ठरली. या दोघांची जोडी जेव्हा प्रेक्षकांमध्ये चर्चेत होती. तेव्हाच ते दोघं परदेशात सुट्टीवर गेले. त्यावेळी त्यांच्याविषयी सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एका मुलाखतीत सलमानला प्रश्न विचारण्यात आला की त्याला लग्नासाठी कशी मुलगी आवडते? सलमाननं या प्रश्नावर उत्तर देत सांगितलं की त्याला लग्नासाठी प्रीति झिंटा योग्य वाटते. सलमानच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे त्या दोघांविषयीच्या चर्चा आणखी वाढू लागल्या होत्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ यांनी केली स्तुती

अमिताभ हे नेहमीच नवोदित कलाकारांना प्रोत्साहित करत असतात. प्रीति झिंटाचे देखील त्यांनी कौतुक केले होते. अमिताभ यांनी साथ  'लक्ष्य', 'झूम बराबर झूम', 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटांमध्ये प्रीतिनं काम केलं होतं. प्रीतिविषयी ते म्हणाले होते की 'एका एकट्या मुलीनं कोणच्याही पाठिंब्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये स्वत: चं स्थान मिळवलं. तिच्या कामाला घेऊन ती इमानदार आहे आणि तिला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे.'

हेही वाचा : सलमान खानच्या नावाने कास्टिंग स्कॅम! भाईजानच्या प्रॉडक्शन हाउसला करावं लागलं आवाहन

करिअरच्या सुरुवातीला प्रीतिनं तर थेट अंडरवर्ल्ड विरोधात कोर्टात साक्ष दिली. दरम्यान, प्रीति झिंटानं 2016 मध्ये स्वत: 10 वर्षे लहान जीन गुडइनफशी सीक्रेट लग्न केलं. जीन हा अमेरिकन आहे आणि त्या दोघांना जुळी मुलं देखील आहेत. प्रीति तिचा पती जीन आणि मुलांसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. तर आज 31 जानेवारी प्रीतिचा 49 वा वाढदिवस आहे. 

Read More