Tamannaah Bhatia : गेले काही वर्षांपासून 1000 कोटींची कमाई करणारे अनेक चित्रपट आहेत. त्यात पठाण पासून पुष्पा 2 ची नावं आहेत. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या फक्त अभिनेत्यानं नाही तर त्याच्यासोबत अभिनेत्रींनी देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. पण जर इतिहास रचण्याविषयी बोलायचं झालं तर भारतात 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री ही तमन्ना भाटिया आहे. तिनं अनुष्का शेट्टीसोबत बाहुबली चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर प्रभाससोबत असलेली तिची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
तमन्ना भाटियानं 15 वर्षांची असताना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या चांद सा रोशन चेहरा या चित्रपटात तमन्ना दिसली होती. याच वर्षी तिनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आणि टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्वत: चं स्थान निर्माण केलं. तिनं हॅप्पी डेज, कल्लूरी आणि अयान सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ती 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली द बिगिनिंग'चा भाग झाली. हा चित्रपट खूप हिट झाला आणि जगभरात या चित्रपटानं 600-650 कोटींची कमाई केली. तर तमन्ना 'बाहुबली 2 द कनक्लूजन'मध्ये देखील दिसली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1810 कोटींची कमाई केली. ते पाहता अनुष्का शेट्टीसोबत 1000 कोटींच्या पार आकडा जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तमन्ना भाटियाचं देखील नाव आहे.
तमन्नाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तमन्ना भाटियाचं अभिनेता विजय वर्मासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना आणि तिच्या कुटुंबाच्या जवळचे असलेल्या अभिनेता चिरंजीवी यांनी तमन्नाला तिचा ब्रेकअप ऑफिशियल करण्याचा सल्ला दिला. तमन्ना आणि चिरंजीवी यांच्यातील मैत्री से रा नरसिम्हा रेड्डी या चित्रपटात काम केल्यानंतर वाढली. लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधअये अजय देवगणच्या रेडमध्ये तमन्ना भाटिया दिसली नाही. त्याशिवाय तिचा 'ओडेला 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटगृहात हा चित्रपट फ्लॉप ठरला. दरम्यान, असं असलं तरी तमन्नाची चित्रपटातील गाणी फार लोकप्रिय होत आहेत.