Marathi News> मनोरंजन
Advertisement

धर्मेंद्र-हेमा, शाहरुख–काजोल नव्हे तर ‘या’ जोडीने दिले सर्वाधिक यशस्वी चित्रपट, 50 सुपरहिट चित्रपटांमध्ये केलंय काम

Most Famous Onscreen Jodi : बॉलिवूड, टॉलिवूड असो किंवा हॉलिवूड इथे कलाकार अनेक नवीन नवीन विक्रम रचत असतात. चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी हे प्रेक्षकांना खूप आवडते. पण तुम्हाला सर्वाधिक सुपरहिट चित्रपट देणारी जोडी माहितीये का?    

धर्मेंद्र-हेमा, शाहरुख–काजोल नव्हे तर ‘या’ जोडीने दिले सर्वाधिक यशस्वी चित्रपट, 50 सुपरहिट चित्रपटांमध्ये केलंय काम

Most Famous Onscreen Jodi : बॉलिवूडमधील हिट जोडी म्हटलं की, अमिताभ - रेखा, धर्मेंद्र - हेमा मालिनी, करिश्मा - गोविंदा आणि त्यानंतर शाहरूख खान - काजोल आपल्या डोळ्यासमोर येतात. या जोड्यांनी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन आणि मनं जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये या जोड्यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. तुम्ही या जोडप्यांना एक-दोन नाही तर 5 किंवा त्याहून अधिक चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले असेल. प्रत्येक चित्रपटात त्यांच्या अद्भुत बाँडिंगने प्रेक्षकांना वेड लावलंय. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका जोडीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पाच-दहा नाही तर 130 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. हे आश्चर्यकारक आहे पण या जोडप्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय. ही जोडी कोण आहे त्यांचं नाव काय आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर चला तर मग आम्ही सांगतो. (Not Dharmendra Hema Shahrukh Kajol but this pair has given the most successful films has worked in 50 superhit films)

'ही' आहे सर्वात हिट जोडी!

आपण ज्या हिट जोडीबद्दल बोलत आहोत ती बॉलिवूजमधील जोडी नाही तर मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी आहे. त्यांचं नाव प्रेम आणि शीला आहे. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत 130 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यातील जवळजवळ निम्मे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

प्रेम-शीलाने इतक्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं की त्यांची नावं एकत्र घेतली जाऊ लागली. 1962 ते 1981 पर्यंत मल्याळम अभिनेते प्रेम नझीर आणि शीला यांनी जवळजवळ 130 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. एकत्र इतकं चित्रपट केल्यामुळे दोघांची नावे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहेत. 1981 नंतर शीलाचे लग्न होऊन ती परदेशात स्थायिक झाली म्हणून या जोडीने एकत्र काम केले नाही. दुसरीकडे, प्रेम नझीर यांनी 1989 मध्ये जगाचा निरोप घेतला. प्रेम हा एक कलाकार आहे ज्याने 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रेम आणि शीला या चित्रपटसृष्टीतील एकमेव हिट जोडी नाहीत ज्यांनी 50 हून अधिक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अमिताभ आणि जया बच्चन यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसला 10 चांगले हिट चित्रपट दिले आहेत तर शाहरुख आणि काजल यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसला 10 चांगले हिट चित्रपट दिले आहेत. त्याच वेळी, प्रसिद्ध जोडपे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे डझनभराहून अधिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम करताना दिसले.

Read More