Marathi News> मनोरंजन
Advertisement

ना करिश्माची मुलं ना प्रिया सचदेवचा मुलगा, 'या' तरुणीला मिळणार संजय कपूरच्या संपत्तीत सर्वाधिक हिस्सा!

Sunjay Kapur Property Share: संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीमध्ये सर्वाधीक हिस्सा कोणाला मिळणार याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.

ना करिश्माची मुलं ना प्रिया सचदेवचा मुलगा, 'या' तरुणीला मिळणार संजय कपूरच्या संपत्तीत सर्वाधिक हिस्सा!

Sunjay Kapur Property Share: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिची पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय कपूर यांच्यानंतर त्यांच्या कोट्यवधी रुपयांचे संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल याची चर्चा रंगली होती. अलीकडेच संजय कपूर यांच्या कंपनीला अलीकडेच नवीन चेअरमनची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाटा करिश्माच्या मुलांना मिळणार की प्रिय सचदेवच्या? याबाबत विविध माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसतेय. 

संजय कपूर यांनी तीनदा लग्न केले होते. पहिलं लग्न त्यांनी फॅशन डिझाइयनर नंदिता महतानी यांच्यासोबत केलं होतं. त्यानंतर त्यांनी करिश्मा कपूरसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी समायरा आणि मुलगा किआन अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या घटस्फोटानंतर संजय यांनी प्रिया सचदेव यांच्यासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगादेखील आहे. मात्र संजय कपूर यांच्या संपत्तीतील सर्वाधिक हिस्सा त्यांच्या तिन मुलांपेक्षा जास्त सावत्र मुलीला मिळणार, अशी चर्चा आहे. 

संजय कपूर यांची नेटवर्थ 10.300 कोटी सांगितले जाते. ते 31 हजार कोटींची कंपनी सोना कॉमस्टारचे मालक आहेत. संजय यांच्या निधनानंतर त्यांची तिसरी पत्नी प्रिया या कंपनीत नॉन एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून वर्णी लागली आहे. तर, संजय यांच्या संपत्तीत सर्वाधिक हिस्सा कोणाला मिळणार, याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र वन  इंडिया रिपोर्टनुसार, संजय कपूर यांच्या संपत्तीतील सर्वाधीक हिस्सा त्यांची सावत्र मुलगी सफीरा चटवाल ला मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहे सफीरा चटवाल?

सफीरा चटवाल संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि तिचा पहिला पती विक्रम चटवाल यांची मुलगी आहे. या दोघांच्या घटस्फोटानंतर सफीरा तिच्या आईसोबतच राहत होती. रिपोर्ट्सनुसार, प्रियासोबत लग्न केल्यानंतर संजय कपूर यांनी तिच्या मुलीची सफिराची जबाबदारी घेतली होती. भारतीय कायद्यानुसार, सफीरादेखील संजय कपूर यांच्या संपत्तीवर समान हक्क मिळू शकतो. 

Read More