Marathi News> मनोरंजन
Advertisement

Krrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री

This Actress in Hrithik Roshan's Krrish 4 : हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' या चित्रपटात आता प्रियांका चोप्रा नाही तर दिसणार ही अभिनेत्री सोशल मीडियावरील त्या कृत्यामुळे एकच चर्चा

Krrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री

This Actress in Hrithik Roshan's Krissh 4 : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा सध्या त्याचा फायटर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे त्याच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट कधी येणार यावर सतत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु होती. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. पण या चित्रपटात कोणती अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार हे समोर आले आहे. 

खरंतर नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं तिच्या एक सनकिस्ड फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं होतं की 'जादू प्रमाणेच मलाही उन्हाती गरज आहे.' त्यावर उत्तर देत हृतिक रोशन कमेंट करत म्हणाला की 'तो येतोय... आला की कळवतो.' यावर प्रतिक्रिया देत श्रद्धा म्हणते खरंच? कधी येतोय, सांग सांग. श्रद्धा आणि हृतिकच्या या कमेंट पाहता नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला आहे की श्रद्धा कपूर ही क्रिश 4 मध्ये दिसणार आहे. इतकंच नाही तर त्या दोघांनी केलेल्या या कमेंट पाहता त्यावर नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत आम्हाला तुम्हाला दोघांना एकत्र पाहायचे आहे. तुम्हाला एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'अगं तो पाकिस्तानी... त्याला दोन मुलं', अली फजलचं नाव ऐकताच घाबरली रिचा चड्ढाची आई

fallbacks

दरम्यान, असे म्हटले जाते की निर्माते आणि श्रद्धामध्ये या चित्रपटाला घेऊन चर्चा सुरु आहे. तर पार्ट 4 मध्ये जादु देखील परत येण्याची शक्यता आहे. मात्र, या बातमीवर अजून कोणी दुजोरा दिलेला नाही. हा चित्रपट नक्की कधी येणार याविषयी अजून कोणतीही माहिती नसली तर हृतिकच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे हृतिक आणि दीपिका लवकरच फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनिल कपूर देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. श्रद्धाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 

Read More