Marathi News> मनोरंजन
Advertisement

नुसरत भरुचाची धमाकेदार एन्ट्री

'प्यार का पंचनामा' गर्ल नुसरत भरुचा लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार...

नुसरत भरुचाची धमाकेदार एन्ट्री

मुंबई : अलीकडच्या काळात आइटम साँग्स हा बॉलिवूड चित्रपटांचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेकदा चित्रपटापेक्षा ही आयटम साँग्स अधिक गाजतात. त्यामुळे या गाण्यांमध्ये झळकणाऱ्या अभिनेत्रीही कायम चर्चेत असतात. 

गेल्यावर्षी 'दिल चोरी साड़ा...' आणि 'छोटे छोटे पैग...' या गाण्यांमुळे लोकप्रिय झालेली 'प्यार का पंचनामा' गर्ल नुसरत भरुचा लवकर एका नव्या आयटम साँगमध्ये दिसणार आहे. या गाण्यात 'स्टुडंट ऑफ द ईयर' फेम सिद्धार्थ मल्होत्राही नुसरतसोबत झळकेल. हे दोघे पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 

 

fallbacks

मरजावा या आगामी चित्रपटातील हे आयटम साँग आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, रकुल प्रीत आणि तारा सुतारिया अशी दमदार स्टारकास्ट आहे. हा चित्रपट मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केला असून तो २ ऑक्टोबर प्रदर्शित होणार आहे. 

Read More