Marathi News> मनोरंजन
Advertisement

महिला खासदाराने बॉयफ्रेंडसोबत नवा संसार थाटल्यानंतर एकच खळबळ !

तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

महिला खासदाराने बॉयफ्रेंडसोबत नवा संसार थाटल्यानंतर एकच खळबळ !

मुंबई : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. निखिल जैनसोबत आधी लग्न आणि आई झाल्याच्या बातम्या, त्यानंतर निखिलसोबतचे लग्न मोडणे आणि अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअर करणे यामुळे नुसरत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 

ऑगस्टमध्ये नुसरतने एका मुलाला जन्म दिला, त्याला वडिल म्हणून यश दासगुप्ताचे नाव देण्यात आले. या बातमीनंतर नुसरत जहाँचे काही फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, त्यानंतर लोकांनी यश दासगुप्तासोबतच्या तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता बऱ्याच दिवसांनंतर नुसरत जहाँने तिच्या वैवाहिक वादावर मौन सोडले आहे.

नुसरत जहाँने यावर्षी निखिलशी तिचा विवाह भारतीय कायद्यानुसार वैध नसल्याचे विधान करून लोकांना आश्चर्यचकित केले. नुसरत जहाँ 2019 मध्ये निखिल जैनसोबत लग्न केल्यानंतर यश दासगुप्तासोबतच्या रोमान्समुळे चर्चेत होती.

fallbacks

लग्नाच्या वादावर मौन तोडत नुसरत जहाँ म्हणाली की, मला पोटगी दिली नाही, हॉटेलचे बिलही दिले नाही. मला त्यांना काहीही सांगायची गरज नाही, मी प्रामाणिक आहे. अभिनेत्री म्हणाली की, मला जगासमोर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले, पण आता मी सर्व काही साफ केले आहे.

fallbacks

नुसरतने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिने सांगितले की, इतरांना दोष देणे किंवा इतरांना वाईट प्रकाशात दाखवणे सोपे आहे. या संपूर्ण वादात तिने कोणालाही निराश केले नाही, असे ती दाव्याने म्हणू शकते.

Read More