Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर महिला खासदाराची प्रियकरासोबत जल्लोषात दुर्गा पूजा

खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असता

घटस्फोटानंतर महिला खासदाराची प्रियकरासोबत जल्लोषात दुर्गा पूजा

मुंबई : टीमएसी खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही अनेकवेळा चर्चेत होते. अलीकडेच तिने यश दासगुप्ताशी लग्न केल्याचा खुलासाही केला. खरंतर, यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुसरतने केकवर पती आणि बाबा लिहिलं होतं, त्यानंतर हे स्पष्ट झालं की, या दोघांनी लग्न केलंय.

नुसरतने यश बरोबर दुर्गा पूजा साजरी केली
आता तिने दुर्गापूजेच्या निमित्ताने तिचा पती यशसोबत दुर्गा पुजेचे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री मस्त दिसत आहे. एका फोटोत नुसरत यशच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर अनेक फोटोंमध्ये दोघंही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. याशिवाय, त्यांचे आणखी काही फोटो समोर आले आहेत जे त्यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही दुर्गा पूजा साजरी करताना दिसत आहेत.

नुसरत जहा सोनेरी बॉर्डर टील साडीमध्ये दिसली होती तसंच तिने यावर चोकर घातला होता. यश दासगुप्ता पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान करताना दिसला. दोघांनीही इतर लोकांसोबत पंडालच्या बाहेर काही फोटोसाठी पोझ दिल्या. नुसरतने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिनी लिहिलं आहे की, शुभो महा सप्तमी.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुसरतने ऑगस्टमध्ये एका मुलाला जन्म दिला. पती निखिलपासून घटस्फोट घेतल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न चालू होता की, तिच्या मुलाचे वडिल कोण आहे. त्याचवेळी, मुलाच्या जन्मानंतर, बर्थ सर्टफिकेट व्हायरल झालं ज्यात वडिलांच्या जागी यश दासगुप्ताचं नाव लिहिलेलं होतं.

Read More