Marathi News> मनोरंजन
Advertisement

आहारतज्ञ ऋजुताने केली करिनाच्या डाएटची पोलखोल

करिना कपूर खान आपल्या फिटनेससाठी सध्या खूप मेहनत घेतेय.

आहारतज्ञ ऋजुताने केली करिनाच्या डाएटची पोलखोल

नवी दिल्ली : लवकरच करिना कपूर 'वीरे दी वेडींग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तैमुरच्या जन्मानंतर हा करिनाचा पहिलाच सिनेमा आहे. वीरे दी वेडींग सिनेमातू चार मैत्रिणींचे बॉण्डींग पाहायला मिळेल. हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार आहे. करिनाचा मुलगा तैमुर लहान असल्याने त्याला अधिक वेळ देणे गरजेचे आहे. तरी देखील वर्षातून एक किंवा दोन सिनेमात काम करणार असल्याचे करिनाने चाहत्यांना प्रॉमिस केले.

करिना कपूर खान आपल्या फिटनेससाठी सध्या खूप मेहनत घेतेय.

दीड वर्षांचा मुलगा असूनही अगदी फिट आणि हेल्दी राहण्यासाठी करिना जीममध्ये जास्त वेळ घालवताना दिसते. झिरो फिगर करिना कपूरचे जीममधील काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

उत्तम आरोग्यासाठी करिनाची अथक मेहनत यातून दिसते.

 

पोस्टने पोलखोल 

 

Because girls who eat rice in the night have the last laugh. #kareenakapoor #riceisnice

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar) on

हे सर्व करताना करिनाने डाएट फॉलो केलाय, खाणंपिणं सोडलय असं तुम्हालाही वाटत असेल तर जरा थांबा.  तिची डाएटेशन  ऋजुता दिवेकरने एक मजेशीर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये करिनाच्या डाएटची पोल खोलली गेल्याचे म्हटले जात आहे. करिनाला रोज भात खायला आवडतो पण याचा तिच्या वजनावर काही परिणाम झाल्याचं दिसत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचय तर तुम्ही भात खाण कमी करा असं नेहमी म्हटलं जात. पण करिनाला भात खायला आवडतो असं खुद्द  ऋजुतानेच सांगितलय. या पोस्टवर करिनाचे चाहते मजेशीर कमेंट देत आहेत. 

Read More