Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : निक-प्रियांकाच्या First kiss चा विषय निघताच...

प्रेम करण्यासाठी कोणत्याही सीमा आणि वयात असणारं अंतर आड येत नाही

VIDEO : निक-प्रियांकाच्या First kiss चा विषय निघताच...

मुंबई : 'देसी गर्ल' म्हणून प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास अखेर लग्नाच्या बेडित अडकले आहेत. प्रियांका आणि निक या दोघांनीही त्यांच्या आयुष्यातील एका नव्या नात्याची सुरुवात केली आहे. त्यासोबतच याच नात्याविषयी त्यांनी काही गोड आणि तितकीच रंजक माहिती सर्वांसमोर आणली आहे. 

इथे एकिकडे प्रियांका आणि निक विवाहबंधनात अडकले असतानाच 'वोग'तर्फे या दोघांचाही सहभाग असणारा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये या दोघांनीही एकमेकांविषयी बऱ्याच गोष्टी व्यक्त केल्या आहेत. काही खास क्षणांच्या गमतीशीर आठवणीही जागवल्या आहेत. 

‘newlyweds game’ असं या गेमचं नाव असून, त्यामध्ये निकने त्यांच्या पहिल्या किसविषयीचाही खुलासा केला आहे. निकच्या या अंदाजाने प्रियांकाच्या चेहऱ्यावर लाजेची झाक आल्याचंही पाहायला मिळालं. 

मुख्य म्हणजे या खेळामध्ये त्यांनी पहिल्य़ा डेटच्या आठवणी जागवल्या असून, निकला सर्वच गोष्टी अगदी पूर्णपणे लक्षात आहेत, हे पाहून खुद्द प्रियांकालाही धक्काच बसला आहे. प्रियांका आणि निक पहिल्य़ांदाच 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर एकत्र आले होते. ज्यानंतर त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं. 

मुळात 'मेट गाला'च्या वेळी ते पहिल्यांदाच भेटले होते, असं नाही. तर ऑस्करच्या आफ्टर पार्टीत या दोघांची पहिली भेट झाली होती. वोगच्या व्हिडिओमध्ये या दोघांनीही त्याविषयीचा खुलासा केला आहे. 

'देसी गर्ल' आणि तिचा परदेशी पती या दोघांचा हा अंदाज पाहता खरंच प्रेम करण्यासाठी कोणत्याही सीमा आणि वयात असणारं अंतर आड येत नाही, हेच स्पष्ट होत आहे

Read More