Marathi News> मनोरंजन
Advertisement

Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

Oh My God 2 : 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता लवकरच 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

Oh My God 2 : अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. अक्षय कुमार यावेळी एका वेगळ्या भुमिकेतून दिसतो आहे. त्याच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्लॉटवरून वेगळाच वाद उफाळला आहे. हा चित्रपट खरंच होमोफोबिया आणि सेक्स एज्यूकेशनवर आधारित आहे का अशा चर्चा ता सर्वत्र रंगल्या आहेत. त्यातून अक्षय कुमारनंच यावेळी खुलासा केला असल्याचे सध्या चर्चेत आहे परंतु नक्की हा प्रकार आहे तरी काय? हा चित्रपट कोणत्या विषयावर बेतलेला आहे आणि नक्की या चर्चा काय आहेत? याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले परंतु यावेळी या चित्रपटाचा प्लॉट लीक झाल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. हा प्लॉट होमोफोबियावरती फिरतो असं यातून कळते. आहे. परंतु याबाबत काहीच पुष्टी करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची सुरूवात ही एका समलिंगी मुलाच्या आत्महत्येनं होईल. या शाळेतच गुडंगिरीचाही मामला झाला होता. यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की या मुलाच्या मृत्यूनंतर पंकज त्रिपाठी हे शाळेत लैंगिक शिक्षण कसे महत्त्वाचे आहे हे सांगताना दिसतात. 

या पोस्टमध्ये आहे की, एक समलिंगी मुलाची कॉलेजमध्ये छेडछाड काढली जाते व त्यानंतर तो आत्महत्या करतो. दुखावलेल्या कॉलेजच्या प्राध्यापकाकडून म्हणजेच पंकज त्रिपाठी यांच्याकडून लैंगिक शिक्षण किती अनिवार्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून ही छेडछाड कमी होईल आणि मुलांना लैंगिक शिक्षणही घेता येईल. यावेळी काही धर्माय याला हे देवाच्या इच्छेविरूद्ध आहे म्हणून याला विरोध करतात. तेव्हा अक्षय कुमार त्यांच्या मदतीला येतो. या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काहीच तथ्यता नाही सोबत याची पुष्टी झालेली नाही. तेव्हा पोस्टबद्दलही काहीच ठामपणे सांगता येणार नाही. कृपया हे लक्षात घ्यावे. 

2012 साली आलेल्या ओह माय गॉड या चित्रपटाचा हा ट्रेलर आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची उत्सुकताही लागून राहिली आहे. या चित्रपटाचा टीझर अक्षय कुमारनं सोशल मीडियावरून शेअर केला आहे. 

Read More