Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी देओलच्या 'गदर 2'ला टक्कर द्यायला येतोय अक्षय कुमारचा OMG 2; पाहा अफलातून Teaser

Oh My God 2: 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता प्रेक्षकवर्गामध्ये दिसते आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शिक होतो आहे याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. सोबतच हा चित्रपट 11 ऑगस्टला सनी देओलच्या 'गदर 2' ला टक्कर देतो आहे.

सनी देओलच्या 'गदर 2'ला टक्कर द्यायला येतोय अक्षय कुमारचा OMG 2; पाहा अफलातून Teaser

Oh My God 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' या टीझरची. या सिनेमाचा टीझर हा दणक्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आता वाढली आहे. 2012 साली आलेल्या 'ओह माय गॉड' या चित्रपटानं विशेष लोकप्रियता सेट केलेली होती. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली होती. आज येईल, उद्या येईल असं करत करत आता हा चित्रपट आता तब्बल 11 वर्षांनी येतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आता हा चित्रपट एका वेगळ्या पठडीतला आहे असं या चित्रपटाच्या टीझरवरूनच दिसत आहे. टीझरमध्ये आपल्याला पंकज त्रिपाठी दिसत आहेत. 2012 साली जेव्हा 'ओह माय गॉड' आला होता तेव्हा या चित्रपटात परेश रावल यांची भुमिका प्रचंड गाजली होती आता या चित्रपटातून त्या जागी आपल्याला पंकज त्रिपाठी पाहायला मिळणार आहेत. 

कपाळावर भस्म, मोठ्या जटा आणि गळ्यात रूद्राक्षाची माळा! 

अक्षय कुमार यावेळी वेगळ्या रूपात दिसतो आहे. भोलेनाथ यांच्या रूपात तो यावेळी या चित्रपटातून समोर येणार आहे. तेव्हा त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना पुन्हा एकदा उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी अक्षयनं आपल्या या चित्रपटाचे अपडेट दिले होते. त्यानं या चित्रपटाचा पोस्टर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी त्याचा याच रूपातला फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्या लुकचे कौतुक केले होते. त्यातून त्याला या वेषातून लोकांना ओळखणंही कठीण झाले होते. 

हेही वाचा - ''...तोपर्यंत मराठी चित्रपट चालणार नाहीत'', लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जुना Video व्हायरल

परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी 

इन्टाग्रामवर अक्षय कुमार यानं हा टीझर पोस्ट केला आहे. तेव्हा या टीझरला मिनिटाचं तूफान लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एका तासात या टीझरनं लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. या खाली प्रेक्षकांनीही तूफान कमेंट्स केल्या आहेत. परंतु तुम्ही एक निरीक्षण केलेत का यावेळी परेश रावल नाही तर पंकज त्रिपाठी दिसत आहेत. सोबतच यावेळी यामी गौतमीही दिसते आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय कुमारची पोस्ट 

अक्षय कुमार आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा हा मोस्ट अवेडेट चित्रपट आहे. सोबतच हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'रख विश्वास' असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

Read More