Marathi News> मनोरंजन
Advertisement

RAKSHA BANDHAN 2021 : सुशांत सिंगच्या बहिणीची भावूक पोस्ट, शेअर केला बालपणीचा फोटो

 सोशल मीडियावर अनेकदा सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्याच्या बहिणीही रोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसतात.

RAKSHA BANDHAN 2021 : सुशांत सिंगच्या बहिणीची भावूक पोस्ट, शेअर केला बालपणीचा फोटो

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. आजही त्याच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात साठलेल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकदा सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्याच्या बहिणीही रोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसतात. दुसरीकडे, आज रक्षाबंधन असताना अशा प्रसंगी भावाची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाला आठवत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

श्वेता सिंग कीर्ती यांनी भाऊ सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टसोबत तिने सुशांतसोबतचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे. यासह श्वेताने 'लव्ह यू भाई, आम्ही नेहमी सोबत राहू' अशा कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
ही पोस्ट पाहून सुशांतचे चाहते ही भावूक झाले आहेत आणि त्यांना सुशांतची आठवणही येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 त्याच्या एका चाहत्याने 'आमचे सुशांत आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील' असे लिहिले आहे.
 
सुशांत सिंग राजपूतच्या 'छिछोरे' चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच 'छिछोरे' चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांद्वारे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

 

 

Read More