Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...

अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Anushka Sharma Pregnancy News: भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहलीनं सध्या ब्रेक घेतला असून तो टीम इंडियासोबत दिसत नाही. इंग्नलंड विरोधात सुरु असलेल्या 5 मॅचच्या सीरिजमध्ये सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये विराटनं बीसीसीआयकडून एक ब्रेक मागितला आहे. सीरिजच्या पुढच्या म्हणजे तीन सामन्यांमध्ये विराट खेळणार की नाही याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यातही दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सनं नुकतंच त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं होतं की विराट हा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यासाठी विराटनं क्रिकेटपासून ब्रेक घेतला असून तो पत्नी अनुष्का शर्मासोबत क्वालिटी टाईम व्यथित करत आहेत. दरम्यान, एबी डिविलियर्सनं यावर आता एक मोठी अपडेट दिली आहे. त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही चुकीची बातमी असल्याचं म्हटलं आहे. 

विराट कोहलीनं जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा त्यानं दोन टेस्ट मॅचमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आता अशी चर्चा सुरु झाली होती, की त्याची आई आजारी आहे. त्यावर विराटच्या मोठ्या भावानं प्रतिक्रिया देत ही खोटी बातमी असल्याचं सांगितलं होतं. विकासचं म्हणणं आहे की त्याची आई फिट आहे. त्यामुळे चुकीची बातमी पसरवू नका. काही लोकांचं म्हणणं आहे की विराट दुसऱ्यांदा वडील होणार आहे. त्यामुळे अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याच चर्चांनंतर आता डिविलियर्सनं समोर येऊन सांगितलं की त्यानं चुकीची बातमी दिली आहे. त्याला माहित नाही की विराट कुठे आहे. 

काय म्हणाला होता एबी डिविलियर्स?

एबी डिविलियर्सनं त्याच्या युट्यूब अकाऊंटवरून विराट कोहली आणि अनुष्का विषयी सांगितलं होतं की कोहली त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करत आहे. इतकंच नाही तर तो लवकरच त्याच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. एबी डिविलियर्सनं केलेल्या या वक्तव्यानंतर अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची चर्चा रंगू लागली होती. मात्र, विराट आणि अनुष्कानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा : मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News

दरम्यान, या आधी अनेकदा अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चा आल्या होत्या. वर्ल्ड कप दरम्यान, अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या बातम्या आल्या होत्या. त्यासोबत एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात विराटसोबत असलेली अनुष्का बेही बंप लपवताना दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी त्यावेळी देखील या बातमीला दुजोरा दिला नव्हता. दरम्यान, अनुष्काच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. 

Read More