मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती ११' या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या या कौन बनेगा करोडपतीच्या प्रश्न उत्तरांच्या खेळात चक्क मांजरीची एन्ट्री झाली आहे. मांजरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
T 3534 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 30, 2019
ऐ बिलौरी , बिल्ली बिल्ली , खेलन चली KBC
जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं अब pic.twitter.com/3pq49UfSXR
त्यांनी ट्विटरच्या मध्यामातून या मांजरीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये त्या मांजरीसाठी एक कविता देखील लिहिली आहे. 'ऐ बिलौरी, बिल्ली बिल्ली, खेलन चली KBC,जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं'.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकरी चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर अमिताभ यांचे फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे ते 'गुलाबो-सिताबो', 'झुंड', 'चेहरे', आणि 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहेत.