Marathi News> मनोरंजन
Advertisement

आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत, युजर म्हणाले खोलीत एकट्यानेच पाहा

ओटीटी वरील आणखी एका बोल्ड वेब सीरीजने प्रेक्षकांची उत्सूकता वाढवली आहे.

आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत, युजर म्हणाले खोलीत एकट्यानेच पाहा

मुंबई : OTT वरील वेब सीरीजची क्रेझ वाढत आहे. एकामागे एक रिलीज होणाऱ्या वेब सीरीजच्या नव्या सीजनमुळे प्रेक्षकांमध्ये ही उत्सूकता धरुन ठेवते. त्यामुळे प्रेक्षकही त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बोल्ड सीनमुळे या वेब सीरीजची आणखी चर्चा होते.

बॉबी देओलच्या आश्रम या वेबसीरीजची चर्चा असतांना आणखी एक बोल्ड वेब सीरीज चर्चेत आहे. MX Player वरच्या या वेब सीरीजमुळे प्रेक्षकांना ही घाम फुटेल. हॅलो मिनी असे या वेब सीरीजचे नाव आहे.

ही वेब सीरीज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. म्हणजेच या वेब सिरीजमध्ये अनेक अॅडल्ट कंटेंट असणार आहे. वेब सीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेलरमध्येच बोल्डनेसची झलक दिसत आहे.

हॅलो मिनी वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, याला लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट मिळाले आहेत. एका युजरने खोलीत एकट्याने पाहा असं म्हटलं आहे.

हे रिव्ह्यू पाहून हॅलो मिनी वेब सिरीजची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे.

Read More