Marathi News> मनोरंजन
Advertisement

Amitabh Bachchan यांच्या घरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; पाहा यावेळी कोण संकटात

अहवाल प्रतिक्षेत.... 

Amitabh Bachchan यांच्या घरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; पाहा यावेळी कोण संकटात

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष देण्यास सुरुवात केली होती. पण, आता मात्र त्यांना कामापासून काहिसा दुरावा पत्करावा लागणार आहे. कारण, त्यांच्या घरापर्यंत पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू पोहोचला आहे. (Amitabh bachchan)

बच्चन कुटुंबीयांपैकी कोणीही अद्यापही या विषाणूच्या संसर्गात नाही. पण, त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे. 

कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच इतर 31 कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्यात आली. 

ब्लॉग लिहित बच्चन यांनी याची माहिती दिली. 'घरगुती कोविड समस्यांशी सामना करत आहे, तुमच्यासोबत पुन्हा संपर्कात येईल', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. 

बिग बींना झाला होता कोरोना.... 
कोरोनाची लागण झाल्यामुळं बिग बींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी चाहत्यांना बरीच चिंता लागून राहिली होती. 

fallbacks

बच्चन यांच्या आरोग्याची काळजी करत काही ठिकाणी चाहत्यांनी होम हवन, पूजाअर्चाही केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

आता पुन्हा एकदा कोरोना त्यांच्या घरात शिरल्यामुळं त्याच प्रकारची चिंता चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Read More