Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वात बोल्ड कंटेटसाठी गाजतोय हा OTT प्लॅटफॉर्म, 'चरमसुख'नं वाढली लोकप्रियता

हवा-नको तो सर्व कंटेंट अगदी सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत आला. 

सर्वात बोल्ड कंटेटसाठी गाजतोय हा OTT प्लॅटफॉर्म, 'चरमसुख'नं वाढली लोकप्रियता

मुंबई  : कोरोनानं जसा जगण्याचा पूर्ण आराखडाच बदलला तसंच आवडीनिवडी आणि काही प्राधान्यक्रमही बदलले. चित्रपटांची जागा वेब सीरिजनं घेतली. मालिकांच्या वाहिन्यांची जागा ओटीटी प्लॅटफॉर्मनं घेतली. आजमितीस असंख्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हवा-नको तो सर्व कंटेंट अगदी सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत आला. 

काही ओटीटी प्लॅटफॉर्म तर असे, जे त्यांच्यावरील बोल्ड कंटेंटसाठीच ओळखले गेले. 

कोरोना काळापूर्वी लाँच झालेलं उल्लू अॅप त्यापैकीच एक. इथं हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती अशा भाषांमधील कार्यक्रम दाखवले जातात. 

पण, आता मात्र या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त कंटेंट हा अश्लीलतेकडे जाणारा असतो. 

उल्लू अॅपनं कोरोना काळात एमएक्स प्लेअरशी हातमिळवणी करत मोठ्या प्रमाणात बोल्ड कंटेंट प्रदर्शित केला. 

इरॉटिक कम सेमी पॉर्न पद्धतीच्या वेब सीरिज इथं पोस्ट केल्या गेल्या आणि त्याला प्रचंड व्ह्यूअरशिप मिळाली. 'चरमसुख' या सीरिजमुळं तर हे अॅप भलतंच व्हायरल झालं. 

27 वेगवेगळ्या आणि इंटिमेट सीन असणाऱ्या कथा यातून सादर केल्या गेल्या. 

'एक ख़्वाब सुहागरात', 'बहुरूपिया', 'करना जरुरी है', 'हायवे', 'पजामा पार्टी', कामवाली बाई (भाग 1, भाग 2), 'डिग्री वाला टीचर', 'सौदा', 'सौतेला प्यार', 'टेलीफोन बूथ', 'हमसे ना हो पायेगा', 'प्यास', जाने अजाने में (भाग 1, भाग 2), 'यौन शिक्षा', 'फ्लॅट 69', 'रोल प्ले' ही अशी त्या भागांची नावं.

fallbacks

प्रत्येक भागाच्या नावावरून त्या किती बोल्ड होत्या याचा अंदाज सहज लावता येत आहे. 

मुख्य म्हणजे आयएमडीबीनंही या सीरिजला 8.2 इतकी रेटिंग दिली होती, ज्याची व्हय़ूअरशिप भल्याभल्या वेब कंटेंटना टक्कर देत होती. 

Read More