मुंबई : तमाम विरोध, वाद आणि सेन्सॉरच्या कटसचा सामना केलेल्या पद्मावतनं शंभर कोटींचा गल्ला पार केलाय. २०१८ या वर्षात सर्वाधिक कमाई केलेला ‘पद्मावत’ हा पहिला सिनेमा ठरलाय.
२५ जानेवारीला पद्मावत देशभरात रिलीज झाला. पाच दिवसांत या सिनेमानं शंभर कोटींची कमाई केलीय. भारतासह अमेरिका, कॅनडामध्येही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. ‘पद्मावत’ला करणी सेनेचा विरोध होता. देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
#Padmaavat sees another ₹ 30+ Cr on Sunday - Jan 28th.. Early estimates are pegged at ₹ 31 to ₹ 32 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 29, 2018
Taking the opening weekend total to a staggering ₹ 115 Crs.. This is despite being a no show in few key states..@deepikapadukone @RanveerOfficial @shahidkapoor
तसंच करणी सेनेला असलेल्या आक्षेपांमुळे सिनेमाचं नावही बदलण्यात आलं होतं, तसंच काही दृश्यांना कात्रीही लावण्यात आली होती. या सगळ्याचा सामना करत अखेर पदमावत प्रदर्शित झाला.