Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : अमेरिकेत 'पद्मावती'च्या अवतारात प्रेक्षकांचा घुमर!

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' भारतात बॉक्स ऑफिसवर जसा धुमाकूळ घालतोय तसाच या सिनेमानं परदेशातील प्रेक्षकांवरही ताबा मिळवलाय.

VIDEO : अमेरिकेत 'पद्मावती'च्या अवतारात प्रेक्षकांचा घुमर!

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' भारतात बॉक्स ऑफिसवर जसा धुमाकूळ घालतोय तसाच या सिनेमानं परदेशातील प्रेक्षकांवरही ताबा मिळवलाय.

अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात राहणाऱ्या काही कुटुंबांनं 'पद्मावत' पाहण्यासाठी अख्खं थिएटरच बुक केलं... इतकंच नाही तर हा सिनेमा पाहायला दाखल झालेल्या या सगळ्या महिला कुटुंबीयांनी पद्मावतीच्या अवतारात सिनेमा पाहिला आणि घुमर गाण्यावर डान्सही केला... एकूण या कुटुंबानं थिएटरच डोक्यावर घेतलं असं म्हटलं तरी हरकत नाही. 

 

व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरद्वारे शेअर केलाय. 

या सिनेमात दीपिका पादूकोणनं राणी पद्मिनी, शाहीद कपूरनं राजपूत राजा महारावल रतन सिंग आणि रणवीर सिंगनं अलाउद्दीन खिलजीची भूमिका अक्षरश: जगलीय.

Read More