Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाचव्या दिवशी 'पॅडमॅन'ने केली 'एवढी' कमाई

 ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. 

पाचव्या दिवशी 'पॅडमॅन'ने केली 'एवढी' कमाई

मुंबई : ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. 

जबरदस्त ओपनिंग

आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटी रुपयांची कमाई केली. या चिपटाचा विषय अतिशय निराळा पण सामान्य आहे.

महिलांना येणाऱ्या मासिक पाळीवर हा सिनेमा भाष्य करतो. सुरूवातीच्या २ दिवसातच सिनेमाने २३.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. 

पाकिस्तानमध्ये बंदी 

पाकिस्तानने या सिनेमाला बॅन केलंय. पाकिस्ताने 'फेडरल संघीय बोर्डा'ने या सिनेमावर बंदी घातलीयं.

महिलांच्या मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेशी संबंधित कहाणीवर 'पॅडमॅन' आधारित आहे. 

आमच्या परंपरा आणि संस्कृतीच्या विरोधात असलेल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगची परवानगी आम्ही देऊ शकत नाही असे पाकच्या फेडरलल बोर्डाने सांगितले. 

६.१२ कोटी रुपयांची कमाई 

रिलीजच्या पाचव्या दिवशी सिनेमाने ६.१२ कोटी रुपयांची कमाई केलीए. आतापर्यंत सिनेमाने ५० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केलायं. 

लवकरच १०० कोटी क्लबमध्ये ?

हा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जातोयं.

Read More