Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ची रिलीज डेट बदलली

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्टारर पॅडमॅन या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आलीये..

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ची रिलीज डेट बदलली

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्टारर पॅडमॅन या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आलीये..

आधी हा सिनेमा 26 जानेवारीला प्रदर्शित होणार होता..मात्र आता हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलंय...हा चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या कोईमतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाने या सिनेमाची निर्मित केली आहे. 

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर त्याचा ‘२.०’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो. अशातच त्याच्या पुढील ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 

अक्षय कुमार याने स्वत: या सिनेमाचा पहिला लूक सोशल मीडिया शेअर केला आहे. हा लूक शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘मला हा फोटो तुमच्यासोबत शेअर करताना गर्व होत आहे. मी नव्या वर्षाची सुरूवात केसरीने करत आहे. हा माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. जो मी पूर्ण मेहनतीने करणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्यात’.

Read More