मुंबई : वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर 25 जानेवारीला रिलीज झाला आहे.
दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रण्वीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरला आहे.
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या चित्रपटाला सुरूवातीपासूनच प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र वाद विवादांचे अडथळे पार करून, चित्रपटाच्या नावामध्ये, चित्रपटामध्ये काही बदल करून 'पद्मावत' रसिकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाने बघता बघता कोटींचा पल्ला पार केला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतने रविवारी 200 कोटींचा पल्ला पार केला आहे.
By early estimates, #Padmaavat has done 18 cr Nett on Sunday - Feb 4th in India..
— Ramesh Bala (@rameshlaus) February 5, 2018
Taking the total to 210.50 cr.
15th Hindi movie to do 200+ Cr Nett India..@deepikapadukone 's 3rd..
1st for Dir #SLB @RanveerOfficial and @shahidkapoor
शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि संजय लीला भंसाळी यांना या चित्रपटामुळे एक गूडन्यूज मिळाली आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभाग झाल्याने शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि संजय लीला भंसाळी यांचा 200 कोटी कमावलेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
दीपिकाला मात्र हा मान तिसर्यांदा मिळाला आहे. 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅप्पी न्यू ईयर' नंतर 'पद्मावत' हा चित्रपट 200कोटींची कमाई करणारा दीपिकाचा तिसरा चित्रपट ठरला आहे. 200 कोटींंचा पल्ला पार करणारा 'पद्मावत' हा 15 वा सिनेमा हिंदी सिनेमा आहे.
'पद्मावत' चित्रपटाला देशामध्ये काही ठिकाणी अजूनही प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला नाही. पण परदेशात अनेक ठिकाणी हा चित्रपट रसिकांची दाद मिळावत आहे.