Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक! फ्लॅटमध्ये सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, दोन आठवड्यांपूर्वीच झाला होता मृत्यू

मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला आहे.   

धक्कादायक! फ्लॅटमध्ये सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, दोन आठवड्यांपूर्वीच झाला होता मृत्यू

Entertainment News : मंगळवारी मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली. पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा असगर हिचा मृत्यू झाला आहे. ती राहत असलेल्या घरातच दोन आठवड्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता. परंतु शेजारी राहणाऱ्या कोणालाच याचा थांगपत्ता लागला नाही. डीआईजी सैयद असदने अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी पाकिस्तानी मीडियाला दिली.  

पोलिसांनी दिली माहिती : 

पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर ही कराचीच्या इत्तेहाद कमर्शियलच्या एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. त्याच फ्लॅटमध्ये हुमैराचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मंगळवार 8 जुलै रोजी या माहितीची पुष्टी केली. पोलिसांच्या माहितीनुसार अभिनेत्रीचा मृतदेह सडलेला होता. डीआईजी सैयद असद यांनी हुमैरा असगर हिच्या मृत्यूबाबत पाकिस्तानी मीडियाला माहिती दिली. डीआईजीने सांगितलं की पोलिसांनी दरवाजाचा टाळा तोडून अभिनेत्रीच्या घरात एंट्री घेतली. आतमध्ये हुमैरा असगरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अंदाज लावला जातोय की तिच्या मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाला असावा. 

अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास केला जाणार :  

पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर ही साधारण 30 ते 35 वयोगटातील असून ती मागील 7 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीचा हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून फोरेंसिक टीमला  हुमैराचा मृत्यू झालेल्या घरातून पुरावे गोळा करण्यासाठी बोलवण्यात आलं. अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे. हुमैरा असगरच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरच्या डॉ. सुमैया यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. डॉ. सुमैया म्हणाले, 'शरीर जवळजवळ कुजण्याच्या एडवांस स्टेजवर होते.'

हेही वाचा : ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्याकडे नाहीये मोबाईल, सोशल मीडियावर अकाउंटही नाही; त्यामागचं कारणही तसंच!

हुमैरा असगरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली तेव्हा पोलिसांनी याबाबत लोकांनी कोणताही पूर्वग्रह, गैरसमज करून घेऊ असं आव्हान केलं असून आम्ही या मृत्यूच्या मागचं कारण शोधून काढू असं आश्वासन दिलं आहे. 

Read More