Marathi News> मनोरंजन
Advertisement

भर गर्दीत माहिरा खानसोबत धक्काबुक्की; अभिनेत्रीचे हावभाव क्षणात बदलले, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती, जिथे तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. पाहूयात हा व्हायरल व्हिडीओ.

भर गर्दीत माहिरा खानसोबत धक्काबुक्की; अभिनेत्रीचे हावभाव क्षणात बदलले, व्हिडीओ होतोय व्हायरल

Mahira Khan Viral Video: प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रमोशनल कार्यक्रमात तिच्याोबत झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अभिनेत्री अस्वस्थ झाली असून, तिच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लंडनमध्ये 'लव्ह गुरू' चित्रपटाचा प्रमोशन कार्यक्रम
माहिरा खान सध्या तिच्या आगामी 'Love Guru' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पाकिस्तानी सुपरस्टार हुमायून सईद प्रमुख भूमिकेत आहे. याच पार्श्वभूमीवर लंडनच्या इल्फोर्ड भागातील Indo-Pak Supermarket येथे एक प्रमोशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमस्थळी अभिनेत्रीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक जण मोबाईल कॅमेरात तो क्षण टिपण्यासाठी पुढे येत होते, तर काही जण तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षारक्षकांनी गर्दीला आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी इतकी प्रचंड होती की व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गैरवर्तन आणि असुरक्षितता
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, माहिरा खान गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती, अस्वस्थता आणि राग स्पष्टपणे जाणवतो. एक सुरक्षा रक्षक तिला घट्ट पकडून ठेवतो. ज्यामुळे ती आणखी अस्वस्थ झाल्याचे दिसतेय. हुमायून सईदही तिच्या मदतीसाठी पुढे आलेला दिसतो.

या घटनेमुळं सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आयोजकांवर आणि सुरक्षारक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. 'सेलिब्रिटी असो वा सामान्य व्यक्ती, अशा प्रकारच्या वागणुकीला समाजात थारा देऊ नये,' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

हे ही वाचा: हेल्मेटशिवाय बाईक चालवल्याने सोनू सूद अडचणीत, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

माहिरा खानचा बॉलिवूड प्रवास आणि वाद
माहिरा खान ही पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने शाहरुख खानसोबत Raees या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही मर्यादा आणण्यात आल्या. यामुळे तिचा बॉलिवूड प्रवास थांबला, तरी ती पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय राहिली आहे.

या घटनेचा परिणाम काय होईल?
ही घटना सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते. लंडनसारख्या शहरातसुद्धा सुरक्षेचा इतका मोठा हलगर्जीपणा झाल्याने आयोजकांच्या भूमिकेवर टीका होत आहे. भविष्यात कलाकार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबाबत अधिक सतर्क राहतील, असे संकेत मिळत आहेत.

 

Read More