Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मॉम'च्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची मुलगी म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईत निधन झालंय. 

'मॉम'च्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची मुलगी म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईत निधन झालंय. 

श्रीदेवी या अशा कलाकारांपैंकी एक ज्यांचं कौतुक केवळ भारतातच नाही तर परदेशातही होतंय... 'मॉम' या सिनेमात श्रीदेवी यांच्यासोबत काम करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीनंही श्रीदेवी यांच्यासोबतचे काही क्षण शेअर केलेत. सजलनं या सिनेमात श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका निभावली होती. 

fallbacks
श्रीदेवी आणि सजल

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सजलनं 'मॉम' सिनेमाचा अनुभव शेअर करताना श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक गोष्टी व्यक्त केल्या. श्रीदेवी या माझ्या भारतातील 'मॉम' होत्या, त्यांनी मला माझ्या आईची कमतरता कधीच जाणवू दिली नाही, असं म्हणत सजलनं आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

माझ पहिलाच सीन श्रीदेवी यांच्यासोबत होता... तेव्हा मी दबावाखाली होते, परंतु, श्रीदेवी मॅमनं मला कशाचीही जाणीव होऊ दिली नाही... सीन पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना माझ्या परफॉर्मन्सबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं, असं सजलनं म्हटलंय. 

Read More