Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जहां जाती हूं आग लगा देती हूं' म्हणत वणव्यात Video शूट करणाऱ्या 'त्या' मुलीवर कारवाई होणार?

या व्हिडीओ क्रिएटरवर कारवाई करण्याची मागणी थेट शासनाकडे करण्यात आली आहे

'जहां जाती हूं आग लगा देती हूं' म्हणत वणव्यात Video शूट करणाऱ्या 'त्या' मुलीवर कारवाई होणार?

मुंबई : हल्ली सेलिब्रिटंपेक्षा जास्त लोकप्रियता ही एखादा इंफ्लुएन्सर किंवा एखाद्या युट्यूबरला मिळताना दिसते. या मंडळींना फार कमी वेळात मिळालेली ही लोकप्रियता डोळे दिपवणारी आहे. असं असलं तरीही काही युट्यूबर, व्हिडीओ क्रिएटर इतका कहर करतात की, बाबांनो आता थांबा! असंच म्हणावं लागतं. (Viral Video )

सध्या असाच एका व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळं या व्हिडीओ क्रिएटरवर कारवाई करण्याची मागणी थेट शासनाकडे करण्यात आली आहे. हा कहर करणारी ही सोशल मीडिया स्टार आहे हुमैरा असगर. (Viral Video News)

मुळची पाकिस्तानी असणाऱ्या हुमैरानं एक Tiktok व्हिडीओ केला, जो पाहून 'हिला काय वेड लागलंय का?' असंच पाहणारे म्हणू लागले. 

आगीशी कसला खेळ
हुमैरानं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सध्या पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंग असणारं पसूरी गाणं ऐकू येत आहे. तिनं हा व्हिडीओ थेट जंगलातच शूट केला जिथं वणवा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. 

बरं इतक्यावरच न थांबता तिनं आगीशीच संबंधित कॅप्शनही लिहिलं. "मैं जहां भी होती हूं आग लग जाती है", हे असं काहीसं कॅप्शन देत तिनं व्हिडीओ शेअर केला. 

 
इतकी आग भडकलेली असतानाच हुमैरा पायघोळ गाऊन घालून मोठ्या तोऱ्यात चालत जाताना दिसत आहे. तिनं भलेही हा व्हिडीओ मनोरंजनासाठी आणि व्ह्यूजसाठी तयार केला असता तरीही तिच्या या कृत्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. 

आपल्याला होणारा हा विरोध पाहता हुमैरानं हा व्हिडीओ डिलीटही केला आहे. पण, त्याचा वाद मात्र अद्यापही कायम आहे. 

Read More