Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तारक मेहता...'मधील सोनूची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये होणार नव्या चेहऱ्याची एन्ट्री

'तारक मेहता...'मधील सोनूची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत सोनूच्या (सोनालिका भिडे) पुन्हा परतण्याचा प्लॉट दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आता लवकरच एक नवा चेहरा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निधी भानुशालीने सोनूची भूमिका अतिशय उत्तम साकारली होती. पण निधी भानुशालीने मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु करण्यात आला होता. आता निर्मात्यांचा हा शोध पूर्ण झाला आहे.

'स्पॉटबॉय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेमध्ये सोनूची भूमिका आता अभिनेत्री पलक सिधवानी साकारणार आहे. पलक सिधवानी नवा चेहरा आहे. याआधी पलकने अनेक शॉर्ट फिल्म आणि जाहिराती केल्या आहेत. 

 
 
 
 

A post shared by Palak Sidhwani (@palaksidhwani) on

सोनूने साकारलेल्या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आलं होतं. त्यानंतर मॉक शूट करण्यात आलं आणि अखेर पलकची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. 'स्पॉटबॉय'ने दिलेल्या वृत्तानुसार, पलकने मालिकेसाठीचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 

आधीच्या सोनूने अर्थात निधी भानुशालीने तिच्या अभ्यासासाठी मालिका सोडल्याचं बोललं जात आहे. निधी मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये बीएचं शिक्षण घेत आहे. सध्या ती अभ्यासावर लक्षकेंद्रित करत आहे.

 
 
 
 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur) on

आता या नव्या सोनूला चाहत्यांची किती पसंती मिळते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read More